team india twitter
Sports

IND vs ENG: निर्णायक सामन्यात भारताची प्लेइंग ११ बदलणार? अर्शदीपचं कमबॅक, या गोलंदाजाची होणार सुट्टी

Team India Playing XI Prediction: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. त्यानंतर राजकोटमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने दमदार पलटवार केला. यासह मालिकेत १-२ ने कमबॅक केलं.

मालिकेतील चौथा टी-२० सामना ३१ जानेवारीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होईल. हा सामना मालिका जिंकण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? कोणाला संधी मिळू शकते? जाणून घ्या.

२ बदल होण्याची शक्यता

भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ आपल्या तगड्या प्लेइंग ११ सह मैदानात उतरु शकतो. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला विश्रांती दिली गेली होती. तर १४ महिन्यांनंतर कमबॅक करत असलेल्या मोहम्मद शमीला संधी दिली गेली होती.

या महत्वाच्या सामन्यासाठी अर्शदीपला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. यासह अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. धाकड अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यामुळे दुबेचा संघात समावेश करण्यात आला आहे.

या सामन्यातून फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईची सुट्टी होऊ शकते. कारण या मालिकेत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. तर गेल्या सामन्यात तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. तर रवी बिश्नोईच्या जागी अर्शदीपचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. यासलह ध्रुव जुरेलला विश्रांती देऊन त्याच्या जागी शिवम दुबेचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

सूर्याच्या फॉर्मने वाढवलं टेन्शन

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा संघाला चांगली सुरुवात करुन देतोय. मात्र त्याला संजू सॅमसनकडून हवी तशी साथ मिळत नाहीये. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याची बॅट चांगलीच तळपली होती.

पण, इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. एकटा संजू नव्हे, तर कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅट देखील शांतच आहे. सूर्यकुमार यादवला गेल्या ३ सामन्यात अवघ्या २६ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे चौथ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

चौथ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११:

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी .

या सामन्यासाठी अशी असू शकते इंग्लंडची प्लेइंग ११:

बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टन, जेमी स्मिथ, जेमी ओवर्टन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदील राशिद, मार्क वुड.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

एकूण सामने -२७

भारतीय संघाने जिंकलेले सामने -१५

इंग्लंडने जिंकलेले सामने -१२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT