ind vs eng saam tv
Sports

IND vs ENG, Weather Prediction: पुण्यात धावांचा पाऊस पडणार की गोलंदाजांची चांदी होणार? खेळपट्टी कोणाला देणार साथ?

India vs England 4th T20I, Weather Prediction: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील चौथा सामना पुण्यात रंगणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.

भारतीय संघाने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये शानदार विजयाची नोंद केली होती. मात्र त्यानंतर राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने दमदार कमबॅक केलं. मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात खेळपट्टी कोणाला साथ देणार ? जाणून घ्या.

कशी असेल खेळपट्टी?

मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी बनवण्यासाठी काळ्या मातीचा वापर केला गेला आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना चांगलीच मदत मिळते.

यासह फलंदाजांनाही मदत मिळते. सामना जसजसा पुढे जातो, तशी फलंदाजांना मिळायला सुरुवात होते. या सामन्यातील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६६ धावा इतकी आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १४४ धावा इतकी आहे.

कसं असेल हवामान?

पुण्यात क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल. अॅक्यूवेदरने दिलेल्या वृत्तानुसार, या सामन्यात पाऊस पडणार नाहीये. तर तापमान २९ ते ३२ डिग्री इतकं असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या मैदानावर कसा राहिलाय रेकॉर्ड?

या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघाने ४ टी-२० सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड ५०-५० असा राहिला आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

SCROLL FOR NEXT