India Vs England 3rd Test x
Sports

Ind Vs Eng : लॉर्ड्सवर रनचेज करणं इतकं कठीण का आहे? भारताच्या लागोपाठ विकेट्स पडण्याचं कारण समोर

India Vs England 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा पाचवा आणि निर्णायक दिवस आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने सलग ४ विकेट्स गमावल्या आहेत. भारताचे ८ गडी बाद झाले आहेत.

Yash Shirke

Ind Vs Eng 3rd Test : लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर वरचढ ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये इंग्लंडने भारताचे ४ गडी बाद केले. सामना भारताकडून इंग्लंडकडे झुकला आहे. विकेट्स पडत असताना रवींद्र जडेजा झुंज देत आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर रनचेज करताना भारतीय संघ संघर्ष करत असल्याचे दिसते.

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील तिसरा सामना लॉर्ड्स स्टेडियमवर रंगला आहे. पहिल्या डावात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघ ३८७ धावांवर ऑलआउट झाला. चौथ्या दिवसाच्या शेवटी भारताने ४ विकेट्स गमावल्या. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाही भारताचे ४ गडी बाद झाले. भारतासमोर १९३ धावांचे लक्ष आहे, दुसऱ्या बाजूला जिंकण्यासाठी इंग्लंडला ३ विकेट्स घ्यायच्या आहेत.

लॉर्ड्स मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना फायदेशीर ठरते. खेळपट्टीवरील गवतामुळे वेगवान गोलंदाजीत स्विंग दिसून येते. जेव्हा खेळपट्टी जुनी होत जाते, तेव्हा फलंदाजी करणे कठीण होते. चौथ्या दिवसापर्यंत खेळपट्टीत किरकोळ भेगा पडल्याचे दिसते. भेगांमुळे वेगवान गोलंदाजांना चांगली सीम मिळते. सध्या सुरु असलेल्या लॉर्ड्स कसोटीत, चौथ्या आणि पाचव्या दिवसापर्यंत खेळपट्टीत चेंडू असामान्य उसळी मारत असल्याचे दिसून आले आहे.

लॉर्ड्सवर पाचव्या दिवसापर्यंत स्विंगचा प्रभाव कमी होतो. पण सीममुळे चेंडू उसळी घेतल्यानंतर दिशा बदलू लागतो. केएल राहुल देखील अशाच एका चेंडूचा बळी ठरला. खेळपट्टीच्या स्वरुपातील बदलामुळेच तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला संघर्ष करावा लागत आहेत. लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत यशस्वी रनचेज १३६ धावांचा होता, १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १३६ धावा करत सामना जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

Malpua Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची ईच्छा आहे? मग, झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी मालपुआ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT