India Vs England 3rd Test
India Vs England 3rd Testx

Ind Vs Eng तिसऱ्या कसोटीमध्ये चिटींग? अंपायरच्या निर्णयाचा भारताला फटका बसणार?

India Vs England : भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना सध्या लॉर्ड्सच्या क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी चिटींग झाल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
Published on

Ind Vs Eng 3rd Test : इंग्लंडमधील लॉर्ड्स स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. काल सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १९२ धावांवर ऑलआउट झाला. वॉशिंग्टन सुंदरने ४ विकेट्स, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. चौथ्या दिवसाच्या शेवटी ५८/४ अशी भारताची स्थिती होती. सोशल मीडियावर या सामन्याबाबत चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतासोबत चिटींग झाल्याचे म्हटले आहे.

India Vs England 3rd Test
Ind Vs Eng : लॉर्ड्सच्या मैदानात राडा, विकेटनंतरचं सेलिब्रेशन सिराजला महागात पडलं; ICCने केली मोठी कारवाई

नेमकं काय घडलं?

सामन्याच्या दुसऱ्या डावातील दुसऱ्या सत्रात ३८ व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा स्ट्राईकवर जो रूट होता. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर जो रूटने पायांचा उपयोग करत फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू थेट येऊन त्याच्या पॅडवर लागला. मोहम्मद सिराजने लगेच अंपायरकडे अपील केले. विकेट मिळाल्याच्या आनंदात तो सेलिब्रेट करु लागला.

India Vs England 3rd Test
Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

सिराजच्या अपीलवर ऑस्ट्रेलियन अंपायर पॉल रायफल यांनी नॉट आउटची घोषणा केली. त्यानंतर शुभमन गिलने लगेचच डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. डीआरएसच्या रिप्ले व्हिडीओमध्ये चेंडू स्टंपच्या रेषेमध्ये पॅडवर पडल्याचे दिसले. त्यामुळे आउटचा कॉल दिला जाईल असे भारताला वाटले. पण बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू लेग स्टंपच्या बाहेरच्या भागाला स्पर्श करत असल्याचे दिसले. त्यामुळे अंपायर्स कॉल घेण्यात आला.

पॉल रायफल यांनी सुरुवातीलाच नॉट आउट म्हटले होते, त्यामुळे नॉट आउटचा निर्णय तसाच राहिला आणि जो रूटला जीवनदान मिळाले. पुढे ४२ व्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने जो रूटला बाद केले. पण तोपर्यंत रूटने ४० धावा केल्या होत्या. अंपायरच्या निर्णयावर सुनील गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा चेंडू स्टंपच्या रेषेत असतो, तेव्हा तो इतका बाहेर कसा जाऊ शकतो, असे गावस्कर काॅमेंट्री बॉक्समध्ये म्हणाले. नेटकऱ्यांनी ही गोष्ट लावून धरली आणि सामन्यादरम्यान चिटींग झाल्याचे म्हटले. काहींना भारतासोबत अन्याय होत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या.

India Vs England 3rd Test
Ind Vs Eng : तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच बाजी मारणार, एजबॅस्टननंतर लॉर्ड्सवरही इंग्लंडचा संघ फेल होणार; फक्त...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com