Ind Vs Eng : तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच बाजी मारणार, एजबॅस्टननंतर लॉर्ड्सवरही इंग्लंडचा संघ फेल होणार; फक्त...

Ind Vs Eng 3rd Test : लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये जर भारताने इंग्लंडला कमी धावांवर रोखले, तर त्यांचा विजय पक्का आहे.
Ind Vs Eng 3rd Test
Ind Vs Eng 3rd Testx
Published On

India Vs England : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही संघांनी ३८७ धावा केल्या आहेत. समान धावसंख्येमुळे चुरस वाढली आहे. निकाल सामन्याच्या शेवटच्या दिवसाच्या खेळावर अवलंबून आहे. पहिल्या डावात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. भारताचे गोलंदाज इंग्लंडला किती धावांवर रोखतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडला कमी धावांवर रोखल्यास भारताचा विजय निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने चेज केलेली सर्वात मोठी धावसंख्या १३६ इतकी आहे. १९८६ मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध खेळताना ही १३६ धावा चेज करत सामना जिंकला होता. यानंतरही भारताने लॉर्ड्सवर आणखी २ कसोटी सामने जिंकले. पण या सामन्यामध्ये भारतीय संघ चेज करत नव्हता. डिफेड करताना २०१४ मध्ये ईशान शर्माच्या गोलंदाजीमुळे भारताने लॉर्ड्सवर विजय मिळवला होता. तर २०२१ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताने इंग्लंडवर मात केली होती.

Ind Vs Eng 3rd Test
Ind Vs Eng : ४, ४, ६... मग पुढच्या ओव्हरमध्ये क्लीनबोल्ड, आकाश दीपने हॅरी ब्रूकच्या दांड्या उडवल्या; पाहा Viral Video

लॉर्ड्वर सर्वात मोठा रनचेज करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. त्यांनी १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना ३४४ धावांचे लक्ष्य गाठले होते. या मैदानावर ३०० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठणारा वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे. आकडेवारीनुसार, लॉर्ड्सवर इंग्लंडने सर्वाधिक वेळा रनचेज करताना सामने जिंकले आहेत. त्यामुळे जर सुरु असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडला कमी धावांवर रोखले, तरच लॉर्ड्स कसोटी सामना भारतीय संघ जिंकू शकेल.

Ind Vs Eng 3rd Test
Shubman Gill : सारा तेंडुलकरची आई शुभमन गिलसमोर बसली, रवींद्र जडेजानं चांगलीच फिरकी घेतली; पाहा Video

लॉर्ड्सच्या मैदानावर रनचेज करणारे संघ

वेस्ट इंडिज - इंग्लंडविरुद्ध ३४४ धावा (१९८४)

इंग्लंड - न्यूझीलंडविरुद्ध २८२ धावा (२००४)

दक्षिण आफ्रिका - ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८२ धावा (२०२५)

इंग्लंड - न्यूझीलंडविरुद्ध २७९ धावा (२०२२)

इंग्लंड - न्यूझीलंडविरुद्ध २१८ धावा (१९६५)

Ind Vs Eng 3rd Test
Ind Vs Eng : शुभमन गिल थेट अंपायर्संना भिडला, एका चेंडूवरुन मोठा राडा; लॉर्ड्सच्या मैदानात काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com