
KL Rahul Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सध्या इंग्लंडमध्ये सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स स्टेडियमवर सुरु आहे. तिसऱ्या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा सलामीवीर केएल राहुलने शतकीय कामगिरी केली आहे. लॉर्ड्सवर शतक ठोकल्यानंतर केएल राहुलने अनेक विक्रम मोडले आहेत.
तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने ३८७ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ ऑलआउट झाला. त्यानंतर भारताचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी १४५ धावा आणि ३ विकेट्स अशी भारताची स्थिती होती. तेव्हा क्रीजवर केएल राहुल आणि रिषभ पंत होते. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये केएल राहुलने शतक पूर्ण केले. या मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक आहे. लीड्स कसोटीमध्ये त्याने शतक ठोकले होते.
लॉर्ड्स स्टेडियमवर शतक झळकवत केएल राहुलने अनेक विक्रम मोडले. लंडनच्या प्रतिष्ठित लॉर्ड्स स्टेडियमवर दोन कसोटी झळकणारा केएल राहुल हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. दिलीप वेंगसरकर यांच्यानंतर केएल राहुलने लॉर्ड्समध्ये दोन कसोटी शतके झळकावली आहेत. २०२१ मध्ये राहुलने लॉर्ड्सवर शतकीय खेळी केली होती. त्यानंतर आता पुन्हा अँडरसन-तेडुलकर ट्रॉफीत राहुलने लॉर्ड्सच्या मैदानावर शतक केले आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या दोघांनाही जमली नाहीये.
केएल राहुलने शतकीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. त्याने लॉर्ड्सवर शतक ठोकताना वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. त्यामुळे राहुल आता सेना देशांमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय सलामीवीर बनला आहे. या यादीत केएल राहुलच्या पुढे सुनील गावस्कर आहेत. २०२१ मध्ये ज्या वेळेस राहुलने लॉर्ड्सवर शतक केले होते, तेव्हा भारताचा विजय झाला आहे. या सामन्यामध्येही त्याने शतक केले आहे, हा सामना देखील भारताने जिंकावा अशी आशा चाहत्यांना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.