sarfaraz khan statement twitter
Sports

Sarfaraz Khan Statement: जडेजाच्या चुकीमुळे रनआऊट झाल्यानंतर सरफराज खानची पहिली प्रतिक्रिया,म्हणाला...

Sarfaraz Khan Statement On Ravindra Jadeja: इंग्लंडच्या गोलंदाजांना त्याला बाद करण्याचा तोडगा सापडत नव्हता. मात्र रविंद्र जडेजाच्या एका चुकीमुळे त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

Ankush Dhavre

Sarfaraz Khan Statement News In Marathi:

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) या दोन्ही संघांमध्ये राजकोटच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात पदार्पण करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) या सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

या संधीचा पुरेपूर फायदा घेत सरफराज खानने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. एकदा सेट झाल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांना त्याला बाद करण्याचा तोडगा सापडत नव्हता. मात्र रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) एका चुकीमुळे त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ५ गडी बाद ३२६ धावांवर जाऊन पोहोचली आहे. रविंद्र जडेजा अजूनही ११० धावांवर नाबाद आहे तर सरफराज खान ६२ धावांची शानदार खेळी करत माघारी परतला. दरम्यान पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर सरफराज खानने आपल्या रनआऊटबद्दल भाष्य केलं आहे.

पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सरफराज खान म्हणाला की, ' मी ६ वर्षांचा होतो जेव्हा त्यांनी माझा क्रिकेटचा सराव सुरू केला. माझं स्वप्न होतं की, मी त्यांच्यासमोर देशाचं प्रतिनिधित्व करावं.' (Cricket news in marathi)

तसेच जडेजाबाबत बोलताना तो म्हणाला की, हा खेळाचा एक भाग आहे. कधी कधी अशा चुका होतात. त्यामुळे रनआऊट होतात की रन मिळतात. ज्यावेळी आम्ही लंचला गेलो त्यावेळी जडेजासोबत चर्चा केली होती. त्याला सांगितलं होतं की, मैदानात फलंदाजी करत असताना माझ्यासोबत बोलत राहा. कारण मला फलंदाजी करताना बोलायला आवडतं. तो माझ्यासोबत संवाद साधत होता आणि समर्थनही करत होता.

भारतीय संघाची धावसंख्या ५ गडी बाद ३२६ धावा..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने सर्वाधिक १३१ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने १०,रजत पाटीदारने ५ आणि शुभमन गिल हा शुन्यावर बाद होऊन परतला. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या सरफराज खानने ६२ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

SCROLL FOR NEXT