IND vs ENG 3rd Test, Ravindra Jadeja: घरच्या मैदानावर जडेजाचं शानदार शतक! मात्र सेलिब्रेशन करण्यास दिला नकार; कारण...

India vs England 3rd Test,Ravindra Jadeja Century: राजकोटच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे.
ravindra jadeja century
ravindra jadeja centurysaam tv news
Published On

Ravindra Jadeja Century:

राजकोटच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रोहित शर्माच्या शतकी खेळीनंतर रविंद्र जडेजाने देखील शतक झळकावलं आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक ठरले आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डावाची सुरुवात करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा फलंदाजी करण्यासाठी आला. त्याने रोहितसोबत मिळून डाव सावरला. दोघांनी मिळून २०० धावा जोडल्या. यासह भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं.

ravindra jadeja century
IND vs ENG Test Series: राजकोट कसोटीपूर्वी रविंद्र जडेजा अन् चेतेश्वर पुजाराचा विशेष सन्मान, कारण...

रविंद्र जडेजाचं शतक..

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजाने सरफराज खानसोबत मिळून स्कोअरबोर्ड हलता ठेवला. त्याने या डावात १९८ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक ठरले आहे. त्याने शतक तर झळकावलं, मात्र शतक झळकावण्यापूर्वी सरफराज खान धावबाद झाला होता. यात जडेजाची चूक होती. त्यामुळे जडेजाने शतक झळकावल्यानंतर सेलिब्रेशन केलं नाही. (Cricket news in marathi)

रोहितनेही झळकावलं शतक..

रविंद्र जडेजाचं शतक होण्यापूर्वी रोहित शर्माने आपलं शतक पूर्ण केलं. त्याने या डावात १९६ चेंडूत १३१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले. या त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक झळकावले आहे. या खेळीदरम्यान त्याने भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सौरव गांगुलीला मागे सोडलं आहे.

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

सचिन तेंडुलकर - ३४३५७

विराट कोहली - २६७३३

राहुल द्रविड- २४२०८

रोहित शर्मा- १८५७७*

सौरव गांगुली- १८५७५

ravindra jadeja century
IND vs ENG Test Series: राजकोट कसोटीपूर्वी रविंद्र जडेजा अन् चेतेश्वर पुजाराचा विशेष सन्मान, कारण...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com