Rishabh Pant Wicket x
Sports

Rishabh Pant : जोफ्रा आर्चरच्या भेदक गोलंदाजीपुढे रिषभ पंत क्लीनबोल्ड, भारताचं टेन्शन वाढलं

Ind Vs Eng 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाला सुरुवात झाली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताचा उपकर्णधार रिषभ पंत ९ धावांवर बाद झाला आहे.

Yash Shirke

India Vs England : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा उपकर्णधार रिषभ पंत फक्त ९ धावांवर बाद झाला आहे. रिषभ पंतच्या रुपाने इंग्लंडने भारताला पाचवा धक्का दिला आहे. जोफ्रा आर्चरने पंतला क्लीनबोल्ड केले आहे. आता केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्यावर भारताच्या विजयाच्या जबाबदारी आहे. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला विकेट मिळाल्याने इंग्लंडच्या खेळाडूंचे मनोबल वाढले आहे.

पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात तिसऱ्या ओव्हरमध्ये म्हणजेच २० व्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चर गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभ पंतने चौकार मारला. त्यानंतर लगेच पाचव्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने रिषभ पंतला क्लीनबोल्ड करुन माघारी पाठवले. आर्चरने इतकी भेदक खेळी केली की, स्टंप बाहेर निघाला. आकाश दीपच्या विकेटनंतर रिषभ पंत खेळण्यासाठी आला होता, पंतने फक्त ९ धावा केल्या.

सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंड आणि भारत दोन्ही संघांनी समान अशा ३८७ धावा केल्या. दुसऱ्या डावामध्ये भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला १९२ धावांवर रोखले. त्यामुळे भारतासमोर लॉर्ड्सवर कसोटी सामना जिंकण्यासाठी १९३ धावांचे लक्ष्य आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडनंतर भारतीय फलंदाज मैदानात उतरले होते.

चौथ्या दिवसाच्या शेवटी भारताची ५८/४ स्थिती अशी होती. भारताची फलंदाजी सुरु झाल्यानंतर लगेच शुभमन गिल शून्यावर बाद झाला. त्यानंतर करुण नायरने १४ धावा केल्या. कॅप्टन शुभमन गिलही लॉर्ड्सवर फेल झाला. तो ६ धावा करुन माघारी परतला. विकेट्स पडत गेल्याने शुभमन गिलनंतर आकाश दीप फलंदाजीसाठी आला. आकाश दीपला बेन स्टोक्सने बाद केले. एका बाजूला विकेट्स पडत असताना केएल राहुल टिकून खेळत होता. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला केएल राहुलसह रिषभ पंत फलंदाजीसाठी आला. पण तिसऱ्याच ओव्हरमध्ये पंत क्लीनबोल्ड झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT