India Vs England x
Sports

Ind Vs Eng तिसऱ्या कसोटी सामन्यात राडा, रवींद्र जडेजा-ब्रायडन कार्स भिडले; मैदानात नेमकं काय घडलं?

India Vs England कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. सामन्याचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. या सामन्यादरम्यान रवींद्र जडेजा आणि ब्रायडन कार्स यांच्यात राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

Yash Shirke

Ind Vs Eng 3rd Test :लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी मैदानावर राडा पाहायला मिळाला. भारताचा रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा ब्रायडन कार्स भर मैदानात एकमेकांना आदळले. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय झालं?

ब्रायडन कार्स गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याच्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजा धाव घेण्यासाठी धावला. क्रीजवर कार्स उभा होता. धाव घेताना जडेजाचे कार्सकडे लक्ष नव्हते. तो चेंडूच्या दिशेकडे पाहत होता. यामुळे अनावधानाने धावताना रवींद्र जडेजा हा ब्रायडन कार्सवर आदळला. धाव पूर्ण केल्यानंतर जडेजा वळला आणि त्याने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण कार्सने वाद घालायला सुरुवात केली. तेव्हा जडेजाही भडकला. तो कार्ससमोर चालून गेला. शेवटी बेन स्टोक्स दोघांच्या मध्ये पडला.

सध्या मैदानावर रवींद्र जडेजा हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याची विकेट भारत आणि इंग्लंड दोघांसाठी महत्त्वाची आहे. जडेजाची विकेट मिळवण्यासाठी इंग्लंडकडून प्रयत्न सुरु आहेत. इंग्लंडचे खेळाडू त्याला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सामन्यात इंग्लंडकडून रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डीला स्लेजिंग होत असल्याचे दिसते. रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी भागीदारी करणे भारतासाठी आवश्यक आहे.

केएल राहुल, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर लवकर बाद झाल्याने आता सामना जिंकवून देण्याची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यावर आहे. भारताने सात विकेट्स गमावल्या आहेत. जर रवींद्र जडेजा किंवा नितीश कुमार रेड्डी यांच्यापैकी कोणाची विकेट पडली, तर सामना भारताच्या हातून निसटेल. यामुळे इंग्लंडचे गोलंदाज जडेजा आणि रेड्डीला त्रास देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप

Prajakta Mali: युनिव्हर्सिटी टॉपर ते टीव्ही होस्ट; प्राजक्ता माळीचा प्रेरणादायी प्रवास

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी ६ ग्रह येणार एकत्र; दुर्मिळ संयोगाचा ३ राशींना होणार भरपूर फायदा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

Kapil Sharma: सलमान खाननंतर कपिल शर्माला का टार्गेट करतेयं लॉरेन्स बिश्नोई टोळी? 'हे' आहे खरे कारण

SCROLL FOR NEXT