राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकला आणि पाहूण्या इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला २० षटकअखेर १७१ धावा करता आल्या आहेत. तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावा करायच्या आहेत.
या सामन्यातही इंग्लंडला प्रथम फलंदाजीला येण्याचं आमंत्रण दिलं. इंग्लंडला ७ धावांवर पहिला धक्का बसला. फिल सॉल्ट अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर बेन डकेट आणि जोस बटलरची जोडी जमली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. डकेट ५१ धावा करत माघारी परतला.
तर बटलरने २४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर इंग्लंकडून फलंदाजी करताना लियाम लिविंग्सटने ४३ धावांची खेळी केली. १२ षटकापर्यंत इंग्लंडचा संघ सामन्यात होता. पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीने सामना फिरवला. त्याने ५ गडी बाद करुन इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं.
भारताचा मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्ती पहिल्या सामन्यापासूनच शानदार गोलंदाजी करतोय. तिच कामगिरी या सामन्यातही पाहायला मिळाली आहे. या सामन्यात त्याने ४ षटकात ६ च्या इकोनॉमीने २४ धावा खर्च करत ५ गडी बाद केले.
वरुण चक्रवर्तीने या डावात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कर्स आणि जोफ्रा आर्चरला बाद केले. याजदरम्यान त्याला हॅट्रीक घेण्याचीही संधी होती. मात्र त्याला हॅट्रीक पूर्ण करता आली नाही. शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला १७१ धावांवर रोखलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.