Ind Vs Eng 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा आज (१३ जुलै) चौथा दिवस आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी आकाश दीपला हॅरी ब्रूकच्या रुपात पहिली विकेट मिळाली आहे. दुसऱ्या सामन्यात १० विकेट्स घेणाऱ्या आकाश दीपने तिसऱ्या सामन्यामध्येही क्लास दाखवला आहे.
तिसऱ्या डावाच्या पहिल्या सत्रात १९ व्या ओव्हरमध्ये आकाश दीप गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हॅरी ब्रूकने जोरदार चौकार मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर पुन्हा चौकार लगावला. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत हॅरी ब्रूकने आकाश दीपची धुलाई केली. त्यानंतर २१ व्या ओव्हरमध्ये आकाश दीप पुन्हा गोलंदाजीला आला. या ओव्हरमध्ये आकाश दीपने हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड केले. १९ व्या ओव्हरमध्ये मार खाल्यानंतर आकाश दीपने पुन्हा कमबॅक करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली.
पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यामध्ये बेन स्टोक्सने टॉस जिंकला पण यावेळेस त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ ३८७ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा संघ फलंदाजीसाठी आला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया देखील ३८७ धावांवर ऑलआउट झाला. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी इंग्लंडचे सलामीवीर पुन्हा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले.
झॅक क्रॉली आणि बेन डकेट फलंदाजी करत असताना मैदानावर राडा सुद्धा झाला. चौथ्या दिवशी, क्रॉली आणि डकेट ही जोडी पुन्हा मैदानात उतरली. बेन डकेटला १२ धावांवर असताना मोहम्मद सिराजने बाद केले. त्यानंतर आलेल्या ऑली पोप देखील सिराजच्या जाळ्यात अडकला. झॅक क्रॉलीला नितीश कुमार रेड्डीने बाद केले. झॅक क्रॉलीने २२ धावा केल्या. त्यानंतर हॅरी ब्रूकला आकाश दीपने क्लीनबोल्ड केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.