team india twitter
Sports

IND vs ENG 2nd Test: आरारारा खतरनाक ! इंग्लंडच्या अर्ध्या संघाचा केला खुर्दा, इंडियाच्या बॉलर्सनं कणाच मोडला

IND vs ENG 2nd Test, Day 4: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने पूर्णपणे पकड बनवली आहे

Ankush Dhavre

IND vs ENG 2nd Test, Day 4:

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने पूर्णपणे पकड बनवली आहे. इंग्लंडचं बॅझबॉल भारतीत संघासमोर पुन्हा एकदा प्लॉप ठरत असल्याचं दिसून आलं आहे. यशस्वी जयस्वालच्या दुहेरी शतकाच्या आणि शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३९९ धावांचं आव्हान ठरलं आहे.

या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगली सुरुवात मिळाली होती.इंग्लंडच्या सलामी जोडीने डावाची सुरुवात करताना ५० धावा जोडल्या. ही जमलेली जोडी आर अश्विनने फोडून काढली. त्याने बेन डकेटला २८ धावा खर्च करत माघारी धाडलं. रेहान अहमद नाईट वॉचमन म्हणून मैदानावर आला होता. त्याने झॅक क्रॉलीसह मिळून ४५ धावा जोडल्या.

इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली.त्याने ८३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने या खेळीदरम्यान ८ चौकार आणि १ षटकार मारले. तो जेव्हा खेळत होता त्यावेळी असं वाटत होता की, इंग्लंडचा संघ हे आव्हान पूर्ण करु शकतो. मात्र ७३ धावांवर फलंदाजी करत असताना कुलदीप यादवने त्याला पायचित करत माघारी धाडलं. झॅक क्रॉलीला सोडलं तर इंग्लंडचा इतर कुठलाच फलंदाज ५० धावांचा पल्ला गाठू शकलेला नाही. (Cricket news in marathi)

इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत..

या सामन्यात भारतीय गोलंदाजांकडून दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत आर अश्विनने १० षटकात ४२ धावा खर्च करत ३ गडी बाद केले आहेत. तर जसप्रीत बुमराहने ३१ धावा खर्च करत १ गडी बाद केला. कुलदीप यादवने ४२ आणि अक्षर पटेलने ७५ धावा खर्च करत १ गडी बाद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT