India Vs England 1st Test  x
Sports

Ind Vs Eng : 3 प्रमुख फलंदाजांची शतकीय खेळी... तरीही टीम इंडियाने नोंदवला लज्जास्पद विक्रम

India Vs England 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना रंगला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून शुभमन गिल, रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनी शतकीय खेळी केली.

Yash Shirke

India Vs England 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड हा तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीमधील पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. भारताकडून यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंत या तिघांनी प्रत्येकी एक शतक ठोकले. पण जेव्हा भारताचा डाव ४७१ धावांवर आला, तेव्हा भारतीय संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हा चौथा सर्वात कमी ऑलआउट स्कोअर आहे. यामध्ये भारताच्या तीन फलंदाजांनी शतकीय कामगिरी केली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४७५ धावा (२०१६ मध्ये), ऑस्ट्रेलियाने ४९४ धावा (१९२४ मध्ये) आणि वेस्ट इंडिजने ४९७ धावा (२००२ मध्ये) सर्वात कमी ऑलआउट स्कोअर केला होता.

२०१९ मध्ये सिडनीत खेळताना भारतीय संघाने ६२२ धावा (सात गडी बाद असताना) जी खेळी केली होती, त्यानंतर भारताची परदेशी भूमीवरील सर्वात मोठी खेळी ठरली आहे. इंग्लंडच्या ओव्हल कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताने ६६४ धावा केल्या होत्या. ही भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने १४७ धावा, उपकर्णधार रिषभ पंतने १३४ धावा केल्या. पहिल्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वाल १०१ धावांवर बाद झाला. पण मधल्या आणि खालच्या फळीत खेळाडू लागोपाठ बाद झाल्याने मोठी धावसंख्या करण्याची संधी हुकली.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक -

पहिला कसोटी सामना : २०-२४ जून, हेडिंग्ले (लीड्स)

दुसरा कसोटी सामना : २-६ जुलै, एजबॅस्टन (बर्मिंगहॅम)

तिसरा कसोटी सामना : १०-१४ जुलै, लॉर्ड्स (लंडन)

चौथा कसोटी सामना : २३-२७ जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)

पाचवा कसोटी सामना : ३१ जुलै-४ ऑगस्ट, द ओव्हल (लंडन)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कमी खर्च, चांगली सोय! भारतातील सर्वात स्वस्त परवडणारे शहर कोणते?

Maharashtra Live News Update: जगदीप धनखड यांचे कॅमेरामॅनही गायब- प्रियंका चतुर्वेदी

Agriculture News : ऊस, द्राक्षाच्या पट्ट्यात कडधान्याचा पेरा; सर्वाधिक २४०० एकरांवर उडीदाची पेरणी

Maharashtra Politics : नकली नोटा, पथनाट्य, पत्ते खेळ आणि होम-हवन ; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात राज्यभर जनआक्रोश आंदोलन

Thane Mahapalika Bharti 2025: खुशखबर! ठाणे महानरपालिकेत सर्वात मोठी भरती; १७७३ रिक्त पदे; पगार १ लाखांपेक्षा जास्त; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT