sai sudharsan and karun nair x
Sports

Ind Vs Eng 1st Test : आयपीएलमध्ये हिरो इंग्लंडमध्ये झिरो! मेरीटवर टीम इंडियात आले, पण पहिल्याच सामन्यात फेल झाले

India Vs England Test Series : इंग्लंडच्या लीड्स शहरातील हेडिंग्ले स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात साई सुदर्शन आणि करुण नायर दोघेही शून्यावर बाद झाले आहेत.

Yash Shirke

Ind Vs Eng : तेंडुलकर अँडरसन ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी शतक ठोकले. दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने देखील शतकीय खेळी केली. मैदानात भारतीय फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांवर वरचढ असल्याचे पाहायला मिळत आहे. पण भारतीय संघातील दोन फलंदाज सपशेल फसले आहेत.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय भारताचा फायदेशीर ठरला. यशस्वी जैस्वालs आणि केएल राहुल या सलामी जोडीने भारताला तगडी सुरुवात करुन दिली. केएल राहुल ४२ धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमावर आलेला साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलच्या साथीने यशस्वी जैस्वालने भारताचा डाव पुढे नेला.

दुसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. रिषभ पंतने त्याचे शतक पूर्ण केले. त्यानंतर अवघ्या काही ओव्हर्सनंतर शुभमन गिल १४७ धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर करुण नायर सहाव्या स्थानी फलंदाजीसाठी आला. चार चेंडू खेळल्यानंतर नायर शून्य धावा करुन माघारी परतला. या सामन्यामध्ये आतापर्यंत साई सुदर्शन आणि करुण नायर हे दोन भारतीय फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत.

साई सुदर्शन मागील काही वर्षांपासून आयपीएलमध्ये दमदार खेळी करत आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. दुसऱ्या बाजूला, करुण नायरने तब्बल आठ वर्षांनी भारतीय संघात कमबॅक केले होते. देशांतर्गत स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षांपासून नायर चांगली कामगिरी करत आहे. नायरने रणजी करंडक स्पर्धेत ८६३ धावा केल्या आणि त्या पर्वात तो सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज होता. विजय हजारे ट्रॉफीतही त्याने सर्वाधिक ७७९ धावा केल्या होत्या.

साई सुदर्शन आणि करुण नायर यांच्याकडून भारतीय संघाला आणि संघाच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. पण ते दोघेही पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाले. साईने याच सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, तर करुण नायर आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर परतला आहे. त्या दोघांमध्ये चांगला खेळ करण्याची क्षमता आहे. साई आणि करुण पुढे कमबॅक करतील अशा सर्वांना आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज वाशिम बाजार समिती राहणार बंद, अडत्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकले

Government Employees: मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ३० दिवसांची भरपगारी सुट्टी

Kitchen Tips: फ्रिजची गरजच नाही! पावसाळ्यात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स वापरा

Buldhana: शेतामध्ये गेले पण परत आलेच नाहीत, शेतकरी पती-पत्नीची आत्महत्या; बुलडाण्यात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडकीला रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट मिळणार, खात्यात ₹१५०० जमा होणार

SCROLL FOR NEXT