MAHMDULLAH 
Sports

IND vs BAN: मोठी बातमी! दुसऱ्या सामन्याआधी स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Mahmudullah Retirement: भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिका सुरु असताना, स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 2nd T20I, Mahmudullah Announced Retirement: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत ७ गडी राखून विजय मिळवला. मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे.

या सामन्यापूर्वी बांगलादेशचा अनुभवी खेळाडू महमदूल्लाहने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय संघाविरुद्ध सुरु असलेली टी-२० मालिका ही त्याच्या टी-२० कारकिर्दीतील शेवटची मालिका असणार आहे.

बांगलादेशला दुसरा मोठा धक्का

महमदूल्लाहची निवृत्ती हा बांगलादेश संघासाठी दुसरा मोठा धक्का असणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनने निवृत्तीची घोषणा केली होती. आता टी-२० मालिका सुरु असताना महमदूल्लाहने मोठा निर्णय घेतला आहे.

या दोन्ही दिग्गज खेळाडूंची जागा भरुन काढणं जरा कठीण आहे. मात्र या दोघांची जागा कोण घेतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शाकिब अल हसनने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली होती.

१७ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम

बांगलादेशसाठी १७ वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या महमदुल्लाहने २००७ मध्ये केनियाविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत तो बांगलादेशच्या टी-२० संघाचा भाग आहे. महमदूल्लाह हा टी-२० क्रिकेटमधील बराच अनुभवी खेळाडू आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त अनुभव असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना तो म्हणाला की, टी-२० क्रिकेटला रामराम करण्याची ही योग्यवेळ आहे. आता तो संपूर्ण लक्ष वनडे क्रिकेटवर केंद्रीत करणार आहे.

महमदूल्लाहने यापूर्वी २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने संपूर्ण लक्ष टी-२० आणि वनडे क्रिकेटवर केंद्रीत केलं. त्याच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १३९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २३९५ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT