jasprit bumrah twitter
Sports

Jasprit Bumrah: बुमराहचा In swinger की बंदुकीची गोळी..मुशफिकुर रहीम पाहतच बसला ;पाहा VIDEO

Jasprit Bunmrah Clean Bowled Mushfiqur Rahim: जसप्रीत बुमराहने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच बांगलादेशला मोठा धक्का दिला आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah News In Marathi: कानपूरच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील सुरुवातीचे ३ दिवस पावसामुळे धुतले गेले. अखेर चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. दरम्यान चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने बांगलादेशला मोठा धक्का दिला आहे.

भारतीय संघाने कानपूर कसोटीतील चौथ्या दिवशी शानदार सुरुवात केली आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या अनुभवाचा फायदा घेत मुशफिकुर रहीमची दांडी गुल केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तर झाले असे की, बांगलादेशने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ३५ षटकअखेर १०७ धावा केल्या होत्या. त्यावेळी मुशफिकुर रहीम आणि मोमिनुल हक नाबाद परतले होते. दोघेही चौथ्या दिवशी फलंदाजीला आले.

त्यावेळी सुरुवातीच्या काही मिनिटातच बांगलादेशला मोठा धक्का बसला. भारतीय संघाकडून ४१ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसराच चेंडू टप्पा पडला आणि आत आला. हा चेंडू मुशफिकुर रहीमने सोडला. मात्र हा चेंडू यष्टीला जाऊन धडकला. मुशफिकुर रहीमला ११ धावांवर माघारी परतावं लागलं आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आकाश दीपने सुरुवातीलाच २ धक्के दिले. जाकीर हसन शून्यावर बाद झाला. तर शदनम इस्लाम २४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार शांतोने ३१ आणि मुशफिकुर रहीमने ११ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनुभाऊची मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

Maharashtra Live News Update: शिर्डी पुन्हा हादरली; भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Onion Potato Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा- बटाटा भजी कशी बनवायची?

Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

SCROLL FOR NEXT