चेन्नईच्या मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. असा कारनामा करणारा तो भारताचा १० वा गोलंदाज बनला आहे. या शानदार कामगिरीसह त्याने भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला मागे सोडलं आहे.
जसप्रीत बुमराह हा वर्तमान भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्याला भारतीय संघासाठी १९६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने २२७ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना ४०० गडी बाद केले आहेत. १९ धावा खर्च करत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
जसप्रीत बुमराहच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद ४०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हरभजन सिंगला मागे सोडलं आहे. बुमराहने २२७ सामन्यांमध्ये हा कारनामा करुन दाखवला आहे. तर हरभजन सिंगने २३७ डावात हा कारनामा केला होता. भारतासाठी सर्वात जलद ४०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन अव्वल स्थानी आहे. त्याने २१६ डावात हा कारनामा केला होता. तर कपिल देव यांनी २२० सामन्यांमध्ये हा कारनामा केला होता.
भारतासाठी ४०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून सर्वात जलद ४०० गडी बाद करणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. या यादीत कपिल देव अव्वल स्थानी आहेत. कपिल देव यांच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६८७ गडी बाद केले आहेत. तर भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या नावे ६१० गडी बाद करण्याची नोंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.