yashasvi jaiswal  pti
क्रीडा

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल बनला नंबर 2! नंबर 1 बनण्यासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

Yashasvi Jaiswal Runs In WTC 2023-25: भारतीय संघातील युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला मोठ्या रेकॉर्डमध्ये अव्वल स्थानी पोहचण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal, IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईत सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला लंचब्रेक पर्यंत २३ षटकात ८८ धावांपर्यंत मजत मारता आली. तर शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंतने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.

भारतीय संघाकडून युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने अर्धशतकी खेळी केली. यासह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

हा सामना खेळायला उतरण्यापूर्वी त्याच्या नावे १०२८ धावा करण्याची नोंद होती. या यादीत तो इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटसह दुसऱ्या स्थानी होता. दरम्यान अर्धशतक पूर्ण करण्यासह तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. फलंदाजीला येण्यापूर्वी त्याला रुटला मागे टाकण्यासाठी ३७० धावांची गरज होती.

अव्वल स्थानी कोण?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट अव्वल स्थानी आहे. रुटने आतापर्यंत १३९८ धावा केल्या आहेत. बांगलादेशेविरुद्धची मालिका ही त्याच्यासाठी उत्तम संधी असणार आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करुन तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत अव्वल स्थानी पोहचू शकतो.

रिषभसोबत मिळून सावरला डाव

या सामन्यात सुरुवातीलाच भारतीय संघाला ३ मोठे धक्के बसले. बांगलादेशकडून हसन महमूदने भारतीय संघातील सुरुवातीच्या ३ फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं. सलामीला फलंदाजीसाठी आलेला रोहित शर्मा अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर गिल शून्यावर आणि विराट कोहली ६ धावांवर माघारी परतला. भारतीय संघाचा डाव अडचणीत असताना, यशस्वीने रिषभसोबत मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव पुढे नेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

SCROLL FOR NEXT