akash deep  twitter
Sports

IND vs AUS: विराटची बॅट घेऊन आला अन् खणखणीत षटकार खेचला! Akash Deep च्या शॉटवर कोहलीची कडक Reaction- VIDEO

Virat Kohli Reaction On Akash Deep Six: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आकाशदीपने गगनचुंबी षटकार खेचला. दरम्यान या षटकारानंतर विराटने दिलेली रिॲक्शन व्हायरल होतेय.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या गाबा कसोटीतील चौथ्या दिवशी आकाशदीप ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. आकाशदीप फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा भारतीय संघावर फॉलोऑनचं संकट होतं.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी २४६ धावा करायच्या होत्या. इथून जसप्रीत बुमराह आणि आाकाश दीपने ३९ धावांची भागीदारी केली आणि संघावर असलेलं फॉलोऑनचं संकट टाळलं.

आकाशदीपचा गगनचुंबी षटकार

आकाशदीप आपल्या वेगवान गोलंदाजीसह मोठे फटके खेळण्यासाठीही ओळखला जातो. मात्र या डावात फलंदाजी करताना त्याचा डिफेन्स पाहायला मिळाला. त्याने बुमराहसोबत भागीदारी करताना वेगाने येणारे चेंडू खेळून काढले.

शेवटी १ विकेट शिल्लक असताना भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत २४६ च्या पार जायचं होतं. २४६ धावांपर्यंत दोघांनीही सावध राहून फलंदाजी केली. मात्र हा पल्ला गाठताच आकाशदीपने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर षटकार मारुन सलामी दिली. दरम्यान हा षटकार मारताच विराटने दिलेली रिॲक्शन व्हायरल होत आहे.

विराटने दिलेली रिक्शन होतेय व्हायरल

तर झाले असे की, फॉलोऑन टळताच आकाशदीपने जोरात बॅट फिरवली. पॅट कमिन्सने जितक्या वेगाने बॉल टाकला, तितक्याच वेगाने हा बॉल स्टेडियमच्या बाहेर गेला. बॉल जेव्हा हवेत होता, त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये असलेला विराटही इतका लांब षटकार पाहून शॉक झाला.

मुख्य बाब म्हणजे, हा षटकार त्याने त्याच बॅटने मारला, जी बॅट त्याला विराटने भेट म्हणून दिली होती. कानपूर कसोटीच्या वेळी विराटने त्याला स्वत: वापरलेली बॅट भेट म्हणून दिली होती.

जडेजा- राहुलची झुंजार खेळी

या डावात भारतीय संघाचा डाव गडगडला होता. मात्र केएल राहुलने एक बाजू धरुन ठेवली होती. त्याने या डावात फलंदाजी करताना, १३९ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने १२३ चेंडूंचा सामना करत ७७ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं आणि शेवटी आकाशदीप- बुमराहच्या जोडीमुळे फॉलोऑन टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT