IND vs AUS, Virat Kohli: विराट नेमका कुठं चुकतोय? सतत फ्लॉप होण्यामागचं कारण काय?

Virat Kohli News In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
IND vs AUS, Virat Kohli: विराट नेमका कुठं चुकतोय? सतत फ्लॉप होण्यामागचं कारण काय?
virat kohli twitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्याच कसोटीत विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीनंतर विराट फॉर्ममध्ये परतलाय, असं म्हटलं जात होतं. मात्र ३ डावात त्याला त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

ब्रिस्बेन कसोटीत तो अवघ्या ३ धावा करत माघारी परतला आहे. विराट सतत एकाच चुकीमुळे बाद होऊन माघारी परततोय. जोश हेजलवूडने त्याला ११ व्यांदा कसोटीत बाद केलंय. आता विराटच्या फलंदाजी टेक्निकवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विराट कोहली कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या नादात बाद होऊन माघारी परतला. चेतेश्वर पुजाराने सांगितलं की, विराटने जेव्हा पर्थ कसोटीत शतक झळकावलं होतं. त्यावेळी चेंडू जूना होता. तर नवीन चेंडूसमोर जेव्हा जेव्हा तो खेळतोय तेव्हा तेव्हा तो लवकर बाद होतोय. कोहलीची फलंदाजी टेक्निक ही नवीन चेंडूंचा सामना करण्यासाठी योग्य नसल्याचं पुजाराने सांगितलं आहे.

IND vs AUS, Virat Kohli: विराट नेमका कुठं चुकतोय? सतत फ्लॉप होण्यामागचं कारण काय?
IND vs AUS: रोहितचा फ्लॉप शो सुरुच...इंग्लंडचा दिग्गज हिटमॅनला भित्रा म्हणाला

पुजाराने सांगितला विराटचा विक पॉईंट

स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात चर्चा करताना चेतेश्वर पुजारा म्हणाला की, ' विराट जेव्हा जेव्हा नवीन चेंडूसमोर फलंदाजीसाठी उतरलाय तेव्हा तेव्हा तो लवकर बाद झालाय. पर्थच्या खेळपट्टीवर जेव्हा चेंडू जुना झाला होता, तेव्हा त्याने शतक झळकावलं होतं. त्याची फलंदाजी टेक्निक ही नवीन चेंडू खेळण्यासाठी योग्य नाही. त्याने १०,१५ किंवा २० षटकांनंतर फलंदाजीला यावं. गोलंदाज जेव्हा नव्या चेंडूने गोलंदाजी करतो, त्यावेळी त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो.'

IND vs AUS, Virat Kohli: विराट नेमका कुठं चुकतोय? सतत फ्लॉप होण्यामागचं कारण काय?
IND vs AUS: 'धोनीकडून शिक आणि निवृत्त हो..', किंग कोहलीला रिटायरमेंटचा सल्ला

तसेच तो पुढे म्हणाला की, ' जेव्हा गोलंदाज २ गडी बाद करतो, तेव्हा संघाचा आत्मविश्वासही वाढलेला असतो. त्यामुळे नवीन चेंडूचा सामना करणं मुळीच सोपं नसतं.' या सामन्यातील पहिला डावात भारतीय संघाने पहिल्या सेशनच्या समाप्तीपर्यंत ६ गडी बाद १८० धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com