Cheteshwar Pujara News In Marathi: भारतीय संघाबाहेर असलेला चेतेश्वर पुजारा सौराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात त्याने १९७ चेंडूंचा सामना करत शानदार शतक झळकावलं आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत, छत्तीसगडच्या फलंदाजांनी ५७८ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना भारताची भिंत खंबीर उभी राहिली.
छत्तीसगडविरुद्ध झळकावलेलं हे शत चेतेश्वर पुजारासाठी खास ठरलं आहे. या शतकी खेळीसह त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २१ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. या खेळीसह त्याने दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
पुजाराने भारतासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ४ फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा समावेश आहे. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या सुनील गावसकर यांनी २५८३४ धावा केल्या होत्या. तर सचिन तेंडुलकरच्या नावे २५३९६ धावा आणि राहुल द्रविडच्या नावे २३७८४ धावा करण्याची नोंद आहे.
या रेकॉर्डमध्ये ब्रायन लाराला सोडलं मागे
पुजाराने आतापर्यंत फलंदाजी करताना २१ हजार धावा केल्या आहेत. यासह हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ६६ वे शतक ठरले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत त्याने वेस्टइंडीजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांना देखील मागे सोडलं आहे. ब्रायन लारा यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६५ शतकं झळकावली होती.
भारतीय संघात संधी मिळेना
चेतेश्वर पुजारा हा भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखला जातो, मात्र त्याला भारतीय संघात संधी मिळणं कठीण झालंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलचा सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. मात्र त्याने संघात कमबॅक करण्याचे प्रयत्न सोडलेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.