Rishabh Pant  twitter
Sports

Rishabh Pant Shot: पैज लावा, असा शॉट पाहिलाच नसेल! पंतने अल्टी पल्टी फिरुन मारला 360 स्टाईल चौकार -VIDEO

Rishabh Pant, IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात रिषभ पंतने हटके स्टाईल चौकार मारला आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS 2nd Test: भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्याकडून टी-२० स्टाईल फलंदाजी पाहायला मिळत असते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने फिरुन किपरच्या डोक्यावरुन ३६० स्टाईल शॉट मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रिषभ पंतचा अविश्वसनीय शॉट

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना रिषभ पंत आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड गोलंदाजी करत होता. बोलँड १७ वे षटक टाकत होता.

त्यावेळी या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रिषभ पंतने फिरुन उजव्या हाताचा फलंदाज हुक शॉट मारतो, असा शॉट मारला. हा चेंडू स्लिपच्या वरुन ४ धावांसाठी सीमापार गेला. हा आगळा वेगळा शॉट पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताचा अर्धा संघ तंबूत

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ३३७ धावा केल्या होत्या. यासह मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीला ४ मोठे धक्के बसले.

या डावात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी मैदानावर आली होती. पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल २४ तर केएल राहुल ७ धावांवर माघारी परतला. शुभमन गिल चांगला सेट झाला होता, मात्र तो २८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली ११ धावांवर माघारी परतला. शेवटी रोहित शर्मा ६ धावांवर तंबूत परतला.

ऑस्ट्रेलियाने केल्या ३३७ धावा

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ३३७ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना ट्रेविस हेडने सर्वाधिक १४० धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने ६४ धावांची खेळी केली. तर सलामीला आलेल्या नॅथन मॅकस्विनीने ३९ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT