IND vs AUS: Out नसतानाही KL Rahul जात होता बाहेर; अंपायरच म्हणाला,अरे बाबा थांब..,नेमकं काय घडलं?

KL Rahul Wicket, India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत केएल राहुल बाद होता. मात्र त्याला जीवदान मिळालं आहे.
IND vs AUS: Out नसतानाही KL Rahul जात होता बाहेर; अंपायरच म्हणाला,अरे बाबा थांब..,नेमकं काय घडलं?
kl rahultwitter
Published On

KL Rahul News In Marathi: अॅडलेडच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला.

यशस्वी जयस्वाल पहिल्याच बॉलवर बाद होऊन माघारी परतावं लागलं. त्यानंतर केएल राहुलही बाद झाला होता, मात्र त्याला जीवदान मिळालं आहे.

IND vs AUS: Out नसतानाही KL Rahul जात होता बाहेर; अंपायरच म्हणाला,अरे बाबा थांब..,नेमकं काय घडलं?
IND vs AUS Record: पिंक बॉल कसोटीत कोण कोणावर भारी? कसा राहिलाय IND vs AUSचा रेकॉर्ड?

केएल राहुलला मिळालं जीवदान

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलची जोडी मैदानात आली. यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर शुभमन गिल आणि केए राहुलने मिळून मोर्चा सांभाळला.

IND vs AUS: Out नसतानाही KL Rahul जात होता बाहेर; अंपायरच म्हणाला,अरे बाबा थांब..,नेमकं काय घडलं?
IND vs AUS: स्टार्कने बदला घेतला! वेगाने बॉल आला अन् पहिल्याच बॉलवर जयस्वालची विकेट -VIDEO

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने गोलंदाजी अटॅकला सुरुवात केली. त्यानंतर ८ वे षटक टाकण्यासाठी स्कॉट बोलँड गोलंदाजीला आला. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या बोलँडने केएल राहुलला खतरनाक चेंडू टाकला.

जो बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेला. गोलंदाजाने जोरदार अपील केली, केएल राहुलनेही पॅव्हेलियनची वाट धरली होती. मात्र तेव्हाच अंपायरने नो बॉलचा इशारा केला. त्यामुळे केएल राहुलला जीवदान मिळालं.

जर हा नो बॉल नसता, तर केएल राहुलला शून्यावर माघारी परतावं लागलं असतं. राहुल माघारी जात असताना, विराटने मैदानात प्रवेश केला होता. मात्र त्याला पुन्हा माघारी परतावं लागलं. मुख्य बाब म्हणजे हा चेंडू बॅटला लागलाच नव्हता. स्निको मीटरमध्ये चेंडू बॅटला लागलाय असं दिसलं नव्हतं. मात्र तरीही केएल राहुल बाहेर जायला निघाला होता. मात्र नो बॉलने त्याला वाचवलं.

भारतीय संघाला मोठा धक्का

या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाला मोठा धक्का बसला. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. मिचेल स्टार्कने टाकलेला पहिलाच चेंडू यशस्वी जयस्वालच्या पॅडला जाऊन लागला. त्यामुळे यशस्वी जयस्वालला गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

IND vs AUS: Out नसतानाही KL Rahul जात होता बाहेर; अंपायरच म्हणाला,अरे बाबा थांब..,नेमकं काय घडलं?
IND W vs AUS W: आजपासून भारत- ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात! केव्हा, कुठे अन् किती वाजता पाहता येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com