Jaydev Unadkat : जयदेव उनाडकटने 10 वर्षांनंतर वनडे क्रिकेट टीममध्ये पुनरागमन केले आहे. बीसीसीआयने 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो तब्बल 10 वर्षांनंतर भारताच्या वनडे संघात खेळताना दिसणार आहे.
जयदेवने शेवटचा वनडे 21 नोव्हेंबर 2013 रोजी कोची येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून आजपर्यंत जयदेवला एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र दरम्यानच्या काळात जयदेवने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. जयदेवला नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्यावर १२ वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. (Latest Sports Updates)
जयदेवने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या संघ सौराष्ट्रसाठी गेल्या अनेक हंगामात चमकदार गोलंदाजी केली आहे. या मोसमातील अंतिम सामन्यातही जयदेवने निर्णायक कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेत आपल्या संघाचा विजय सोपा केला. या चांगल्या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.
आता बीसीसीआयने वनडे टीममध्ये त्याचा समावेश केला आहे. 31 वर्षीय जयदेवने वनडे करिअरमध्ये आतापर्यंत फक्त 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत.आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळते का हे पाहावे लागेल.
उनाडकटची रणजीतील कामगिरी
रणजीच्या फायनमध्ये सौराष्ट्रने बंगालचा नऊ गडी राखून पराभव केला. टीम इंडियातून वगळण्यात आलेला डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने अंतिम सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या.
जयदेव उनाडकट रणजी ट्रॉफीच्या इतिहासात 300 बळी घेणारा सौराष्ट्राचा पहिला गोलंदाज ठरला आहे. 2010 मध्ये रणजी स्पर्धेत त्याने पदार्पण केले होते. जयदेवने यंदाच्या मोसमात सौराष्ट्रकडून 8 डावात एकूण 26 विकेट घेतल्या आहेत. कोणत्याही एका रणजी मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही जयदेवच्या नावावर आहे. 2019-20 च्या मोसमात त्याने 67 विकेट घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.