IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ६ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारताने 2-0 ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाने आणि खेळाडूंनी अनेक मोठे विक्रम केले आहेत. या विक्रमांबद्दल जाणून घेऊया. (Cricket News)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 वा विजय
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 वा विजय आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला गेल्या काही काळात भारताने खूप मोठं आव्हान दिलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा 32व्यांदा कसोटीत पराभव
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हा 32वा विजय आहे. एका संघाविरुद्ध भारताचा हा सर्वोच्च कसोटी विजय आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 31 तर श्रीलंकेविरुद्ध 22 विजय मिळवले आहेत. (Latest Sports Updates)
जडेजाची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी
रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात 42 धावांत ऑस्ट्रेलियाचे 7 फलंदाज बाद केले. ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. या सामन्यात त्याने 10 विकेट घेतल्या. दुसऱ्यांदा जडेजाने एका सामन्यात 10 विकेट्स घेतल्या.
दिल्लीत झालेल्या 13 कसोटीत भारत अजिंक्य
दिल्लीच्या मैदानावर कसोटीत भारतीय संघ 13 सामन्यांत अपराजित आहे. याशिवाय भारताने मुंबईच्या ब्रेबोन स्टेडियम आणि मोहालीच्या बिंद्रा स्टेडियमवर सलग १३ कसोटी सामने अजिंक्य राहिले आहेत.
तीन फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ
आजच्या कसोटी विजयासह भारत कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडे आणि टी-20 मध्ये संघ आधीच नंबर वन आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नंबर वन संघ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
विराटच्या 25 हजार धावा पूर्ण
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराटने 492 व्या सामन्यातील 549 व्या डावात ही कामगिरी केली. सर्वात कमी डावात इथपर्यंत पोहोचणारा तो फलंदाज बनला आहे.
पुजाराची 100व्या कसोटीत विजयी फटकेबाजी
चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) आपल्या 100व्या कसोटीत चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्याआधी, केवळ ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला त्याच्या 100 व्या कसोटीत विजयी शॉट खेळावा लागला होता.
नॅथन लायनचा भारताविरुद्धचा विक्रम
ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने या सामन्यात भारताविरुद्ध 100 कसोटी बळी पूर्ण केले. त्याने पुन्हा एकदा 5 विकेट्स पूर्ण केल्या. आता तो कसोटीत सर्वाधिक पाच बळी घेणारा भारताचा गोलंदाज ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.