IND VS AUS 2nd Test: याला म्हणतात स्पोर्टिंग स्पिरिट! भारतानं सामना जिंकला पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मनं जिंकली

हा सामना भारतीय संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा १०० वा सामना होता. मात्र सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हा सामना आणखी खास बनवला आहे.
Australian Team
Australian TeamSaam TV

IND VS AUS 2nd Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवला.

यासह भारतीय संघाने २-० ची आघाडी घेतली आहे. हा सामना भारतीय संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा १०० वा सामना होता. मात्र सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हा सामना आणखी खास बनवला आहे. (Latest Sports Updates)

Australian Team
IND VS AUS 2nd Test:जडेजा अन् अश्विनची जोरदार कामगिरी! ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांवर संपुष्टात

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र सामना झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कृत्याने कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ऑटोग्राफ केलेली जर्सी भेट म्हणून दिली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या ११३ धावांवर संपुष्टात..

या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करताना २६३ धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दुसऱ्या ऑस्ट्रेलियाला केवळ ११३ धावा करता आल्या. यासह ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघासमोर विजयासाठी ११५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारतीय संघातील फलंदाजांनी ६ गडी राखून पूर्ण केले

Australian Team
IND VS AUS:अश्विन-जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा 'नागीण डान्स',५९ धावा देत ९ फलंदाज केले बाद

भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी..

भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज नतमस्तक होताना दिसून आले होते. या डावात देखील अश्विन आणि जडेजाची जोडी ऑस्ट्रेलिया संघावर भारी पडली. या डावात रवींद्र जडेजाने ४२ धावा खर्च करत ७ गडी बाद केले.

तर आर अश्विनने ५९ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. या सामन्यातील पहिल्या डावात आर अश्विनने ३ तर जडेजाने देखील ३ गडी बाद केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com