australia twitter
Sports

IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाचा 12th Man? आधी KL Rahul अन् आता जयस्वाल; स्निको मीटरने फिरवला गेम

India vs Australia 4th Test, Snickometer Controversy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीत यशस्वी जयस्वालला एका चुकीच्या निर्णयामुळे बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात स्निकोमीटर चर्चेचा विषय ठरतोय. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३४० धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना, यशस्वी जयस्वालने शानदार ८४ धावांची खेळी केली. तो कसोटी सामना वाचवण्यासाठी खंबीरपणे उभा होता. मात्र तिसऱ्या अंपायरच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्याला बाद व्हावं लागलं आहे.

स्निको मीटरने बिघडवला खेळ

तर झाले असे की, भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३ सेशनमध्ये ३४० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज सामना ड्रॉ करण्यासाठी प्रयत्नशील होते. सलामीला आलेला फलंदाज यशस्वी जयस्वाल शेवटपर्यंत खंबीरपणे उभा होता. त्याने पहिल्या डावात ८२ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात ८४ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू यशस्वी जयस्वालच्या बॅटच्या जवळून यष्टीरक्षकाच्या हातात गेला.

पॅट कमिन्स आणि ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार अपील केली. मात्र अंपायरने ही अपील फेटाळून लावली. त्यानंतर कमिन्सने DRS ची मागणी केली. रिप्लेमध्ये पाहिलं असता, चेंडू हल्का बॅटला लागून वळलाय असं दिसून येत होतं.

मात्र स्निको मीटरमध्ये बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नसल्याचं दिसून आलं. मात्र तरीही अंपायरने त्याला बाद करत माघारी धाडलं. या विकेटवरुन चांगलाच वाद रंगला.

केएल राहुललाही दिलं होतं बाद

पर्थच्या मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीत केएल राहुल सॉलिड फलंदाजी करत होता .मात्र त्याला चुकीच्या निर्णयामुळे बाद घोषित करावं लागलं. चेंडू बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला, पण अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं.

रिप्लेमध्ये पाहिलं असता चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नसल्याचं दिसून आलं होतं.मात्र स्निकोमीटरमध्ये चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेल्याचं दिसून आलं. या निर्णयावरुनही चांगलाच वाद पेटला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT