rohit sharma Twitter
क्रीडा

IND VS AUS 4th test: रोहित - गिलची दमदार सुरुवात, ४८० धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या बिनबाद ३६ धावा, पाहा स्कोअरकार्ड

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला.

Ankush Dhavre

Ind vs Aus 4th test Day 2: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरु आहे.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा प्रत्युत्तरात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे.

भारतीय संघाची संयमी सुरुवात.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. २ दिवस आणि १६७ षटके फलंदाजी करत ४८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ३६ धावा केल्या आहेत.

भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने १७ तर शुभमन गिलने १८ धावा केल्या आहेत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली.

तर कॅमरुन ग्रीनने ११४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील मोलाचे योगदान दिले. शेवटी टॉड मर्फीने ४१ आणि लायनने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे.

आर अश्विनचे पंचक..

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एकीकडे भारतीय गोलंदाज संघर्ष करताना दिसून येत होते.

तर आर अश्विनने ९१ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. तर शमीने २ आणि अक्षर, जडेजाने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

SCROLL FOR NEXT