sachin tendulkar twitter
Sports

IND vs AUS, KL Rahul: टीम मॅन! कुठल्या क्रमांकावर खेळायचंय? पत्रकाराच्या प्रश्नावर KL Rahulचं मन जिंकणारं उत्तर

KL Rahul Interview: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुलला फलंदाजी क्रमाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने हटके उत्तर दिलं आहे.

Ankush Dhavre

KL Rahul News In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मलिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर होणार आहे.

हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाला ५ पैकी ४ सामन्यांमध्ये पराभूत करावं लागणार आहे.

हा सामना डे- नाईट कसोटी सामना असणार आहे. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी १०० टक्के इतकी आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. आनंदाची बातमी म्हणजे पहिल्या सामन्यातून संघाबाहेर असलेला संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातून कमबॅक करताना दिसून येणार आहे.

त्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी आणखी बळकट होणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलला पत्रकार परिषदेत कुठल्या क्रमांकावर खेळायला आवडतं? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर केएल राहुलने हटके स्टाईल उत्तर दिलं आहे.

कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडतं?

पत्रकार परिषदेत, केएल राहुलला आपल्या फलंदाजी क्रमाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पत्रकाराने विचारले की, ' तुला सलामी की मध्यक्रम? कुठल्या क्रमांकावर फलदांजी करायला आवडतं? या प्रश्नाचं उत्तर देताना केएल राहुल म्हणाला की,' कुठल्याही क्रमांकावर..मी याआधीही सांगितलं आहे, मला फक्त प्लेइंग ११ मध्ये जागा हवी आहे. मला फक्त संघासाठी खेळायचं आहे.'

केएल राहुलला बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेतून प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली होती.

या सामन्यातील पहिल्या डावात त्याने २६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने यशस्वी जयस्वालसोबत मिळून २०१ धावांची भागीदारी केली.

या दरम्यान त्याने ७७ धावांची खेळी केली होती. दरम्यान आता रोहित शर्मा आल्यानंतर रोहितला कितव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT