KL Rahul: केएल राहुलने लखनऊची साथ का सोडली? स्वत:च सांगितलं कारण

KL Rahul On Lucknow Super Giants: लखनऊ सुपर जायंट्सने केएल राहुलला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.
KL Rahul ने स्वाभिमान जपला! 18 कोटींना लाथ मारत लखनऊची साथ सोडली; 4 संघांकडून मोठी ऑफर
kl rahultwitter
Published On

काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या सर्व फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने केएल राहुलला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात तो या संघाचा कर्णधार होता.

मात्र त्याला रिटेन न केल्याने चांगल्याच चर्चा रंगल्या. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर केएल राहुल आणि संघमालक संजीव गोयंका यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यामुळे केएल राहुलने या संघाची साथ सोडली असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता केएल राहुलने यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाला केएल राहुल?

स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना केएल राहुल म्हणाला की, 'मला नवीन सुरु करायची आहे. मला नवीन पर्याय शोधायचे होते. मला त्या संघाकडून खेळायचं आहे, जिथे मला स्वातंत्र्य मिळेल. कधी-कधी दूर जाऊन स्वत:साठी काहीतरी नवीन शोधायचं असतं.'

केएल राहुल गेल्या ३ वर्षांपासून लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. त्याला २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. यादरम्यान २ वेळेस या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

गेल्या हंगामात हा संघ सातव्या क्रमांकावर होता. तर केएल राहुलच्या गेल्या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १४ सामन्यांमध्ये १३६.१३ च्या स्ट्राईक रेटने ५२० धावा केल्या होत्या. त्याचा आयपीएल स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने १३२ सामन्यांमध्ये ४६८३ धावा केल्या आहेत.

KL Rahul ने स्वाभिमान जपला! 18 कोटींना लाथ मारत लखनऊची साथ सोडली; 4 संघांकडून मोठी ऑफर
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचं हे चुकलंच! बॉर्डर- गावसकर ट्रॉफी आधी ऑस्ट्रेलियाकडून रोहित शर्माचा अपमान?

भारतीय कसोटी संघात कमबॅक करणार?

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून केएल राहुलला संघाबाहेर राहावं लागलं होतं. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नसणार आहे. त्याच्याऐवजी, केएल राहुलला सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली जाऊ शकते.

KL Rahul ने स्वाभिमान जपला! 18 कोटींना लाथ मारत लखनऊची साथ सोडली; 4 संघांकडून मोठी ऑफर
IND vs SA 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस; टीम इंडियाची बॅटिंग; पाहा दोन्ही संघांची Playing XI

लखनऊ सुपर जायंट्सने या खेळाडूंना केलं रिटेन

आगामी हंगामासाठी लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरनला २१ कोटी रुपयात, रवि बिश्नोईला ११ कोटी रुपयात, वेगवान गोलंदाज मयांक यादवला ११ कोटी रुपयांत, मोहसिन खानला ४ कोटी आणि आयुष बदोनीला ४ कोटी रुपयांत रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी हंगामात निकोलस पूरन या संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com