yashasvi-jaiswal twitter
क्रीडा

Yashasvi Jaiswal News: टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरताच यशस्वीने 'या' खेळाडूची मागितली माफी! काय आहे कारण?

Yashasvi Jaiswal Apologies Ruturaj Gaikwad: या सामन्यात यशस्वी जयस्वाल सामनावीर ठरला. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने माफी मागितली आहे. काय आहे कारण? जाणून घ्या .

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal On Ruturaj Gaikwad Runout:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्याच्या मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२६ नोव्हेंबर) तिरुवनंतपुरमच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४४ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्याचा सामनावीर ठरलेल्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) माफी मागितली आहे.

ऋतुराज गायकवाडची मागितली माफी..

या सामन्याचा सामनावीर ठरताच, यशस्वी जयस्वालने आपली चूक मान्य करत ऋतुराज गायकवाडची माफी मागितली. तर झाले असे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यात यशस्वी जयस्वालने शॉट मारला आणि २ धाव घेण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव दोघांनी वेगात पूर्ण केली. त्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी यशस्वीने धावण्याचा इशारा केला. ऋतुराज अर्ध्या क्रीझपर्यंत पोहोचताच यशस्वीने त्याला मागे जाण्याचा इशारा केला. ऋतुराज मागे जाणार इतक्यात यष्टीरक्षक वेडने त्याला धावबाद केलं. (Latest sports updates)

या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर तो म्हणाला की, ' मी अजून शिकतोय. गेल्या सामन्यात जे झालं ती माझी चूक होती आणि मी ऋतुराजची माफी मागितली होती. मी माझी चुकी मान्य केली. ऋतू दादा चांगला माणूस आहे. मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. मी माझ्या शॉट्समध्ये सुधारणा करतोय. मी माझी मानसिक स्थितीतही सुधारणा करतोय.'

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या दिशेनं लागला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने ५३, ऋतुराज गायकवाडने ५८ आणि इशान किशनने ५२ धावांची खेळी केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २३५ धावांचा डोंगर उभारला. तर या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १९१ धावा करता आल्या. भारतीय संघाने या सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT