mitchell starc twitter
Sports

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Harshit Rana -Mitchell Starc Viral Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान हर्षित राणा आणि मिचेल स्टार्क यांच्यात मजेशीर संवाद झाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Mitchell Starc- Harshit Rana, IND vs AUS 1st Test Day 2: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव १०४ धावांवर गुंडाळला.

शेवटी मिचेल स्टार्क आणि हेजलवूड यांच्यात महत्वपूर्ण भागीदारी झाली. ही भागीदारी सुरु असताना, भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगलाच हल्लाबोल केला. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या हर्षित राणाचे काही चेंडू मिचेल स्टार्कच्या अंगाला आणि हेल्मेटला जाऊन लागले. दरम्यान दोघांमध्ये मजेशीर चर्चा देखील झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

व्हिडिओ होतोय व्हायरल

आयपीएल स्पर्धेत धुमाकूळ घालणाऱ्या हर्षितला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीची फायदा घेत त्याने शानदार गोलंदाजी केली. दरम्यान हर्षितचा एक चेंडू उसळी घेऊन स्टार्कच्या बॅटला लागला आणि स्लिपमध्ये गेला.

त्यावेळी स्टार्कने तोंडाने उत्तर दिलं, स्टार्क म्हणाला, 'मी तुझ्यापेक्षा वेगवान चेंडू टाकतो,तुला माझ्याही गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे..' हर्षित राणानेही त्याला हसत उत्तर दिलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आता स्टार्क गोलंदाजीला आल्यानंतर राणालाही त्याच्या खतरनाक चेंडूंचा सामना करावा लागणार आहे. ही लढत पाहणं मजेशीर ठरेल.

हेडला बाद करत कसोटी कारकिर्दीची सुरुवात

हर्षित राणा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलाच सामना खेळतोय. त्याने पहिल्याच सामन्यात, भारतीय संघाला नडणाऱ्या ट्रेविस हेडची दांडी गुल केली. यासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

बुमराहने घेतल्या ५ विकेट्स

या सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे. त्याने मालिकेतील पहिल्याच डावात ५ विकेट्स घेत दमदार सुरुवात केली आहे. बुमराहने ११ व्या वेळेस कसोटी क्रिकेटमध्ये ५ विकेट्स घेण्याचा कारनामा करुन दाखवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

Shocking : दुर्दैवी घटना! देवदर्शनाला गेलेल्या तरुणावर काळाचा घाला, समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवलं

SCROLL FOR NEXT