suryakumar yadav twitter
Sports

Suryakumar Yadav Statement: कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात सूर्याचा धमाका! ऑस्ट्रेलियाला धूळ चारताच काय म्हणाला?

India vs Australia, 1st T20I: भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आह. या सामन्यानंतर काय म्हणाला भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Statement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला टी -२० सामना विशाखापट्टनममध्ये पार पडला.

या सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादवने ४२ चेंडूत ८० धावांची तुफानी खेळी केली. या दमदार खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान या विजयानंतर काय म्हणाला सूर्यकुमार यादव? जाणून घ्या.

या सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, ' ज्याप्रकारे हे खेळाडू खेळले आहेत त्याचा मला खूप आनंद आहे. आम्ही दबावात होतो. मात्र आम्ही ज्याप्रकारे कमबॅक केलं आहे,ते अप्रतिम होतं. भारताचं नेतृत्व करणं हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा असं वाटतं की आपणही देशाचं नेतृत्व करावं. मला परफेक्ट व्हायला थोडा वेळ लागेल, मात्र ही संधी मला मिळाली याचा मला अभिमान आहे.'

गोलंदाजांबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' मला वाटलं होतं मैदानावर दव असेल. मात्र असं काहीच झालं नाही. मला हे ही माहित होतं की, मैदान छोटं होतं त्यामुळे धावा करता येतील. सुरुवातीला ते ज्याप्रकारे धावा करत होते, त्यावरून मला असं वाटलं होतं की,आम्हाला २३० धावांचा पाठलाग करावा लागेल. मात्र आमच्या गोलंदाजांनी त्याला बॅकफुटवर ढकललं. १६ व्या षटकानंतर आमच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कमबॅक केलं. आम्हाला या सामन्यात सकारात्मक राहायचं होतं आणि आम्ही तेच केलं.' (Latest sports updates)

तसेच रिंकू सिंगबाबत बोलताना तो म्हणाला की, ' मी त्यांना सांगितलं होतं की, सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊ नका. ज्याप्रकारे या सामन्यात त्यांनी संयम राखून ठेवला, ते पाहून खूप बरं वाटलं. रिंकूसाठी ही सामान्य स्थिती होती. शेवटच्या क्षणी त्याच्या सहनशीलतेने मलाही दिलासा मिळाला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

SCROLL FOR NEXT