Maharashtra Politics : 'तुम्ही दिल्लीत या...', मोदी-फडणवीसांच्या गुप्त भेटीत काय ठरलं? संजय राऊतांनी फोडला बॉम्ब

anjay Raut on Modi Fadnavis meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील भेटीनंतर संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. फडणवीसांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा राऊतांनी केला.
Devendra Fadnavis, Narendra Modi, Sanjay Raut, Maharashtra politics
Devendra Fadnavis, Narendra Modi, Sanjay Raut, Maharashtra politicsSaam TV Marathi
Published On

Devendra Fadnavis, Narendra Modi, Sanjay Raut, Maharashtra politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय भेटीवरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान नक्की काय शिजले, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या गुप्त भेटीची थेटीतील 'इनसाईड स्टोरी' सांगत मोठा खळबळजनक दावा केला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. देशात उत्तम शिक्षणमंत्री देवेंद्र फडणवीसच होऊ शकतात, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा करून केंद्रात मनुष्यबळ मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश दिल्याचा दावा राऊत यांनी केला. दरम्यान, या वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या राजकीय वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Devendra Fadnavis, Narendra Modi, Sanjay Raut, Maharashtra politics
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ₹१५००; जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्व आणि महायुती सरकारवर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावण्यावरून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय हालचालींवरून राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून का हलवले जात आहे? तिकडे एकनाथ शिंदे काय हालचाली करत आहेत, हे सर्वांना उघडपणे दिसत आहे, असे संजय राऊतम म्हणाले.

Devendra Fadnavis, Narendra Modi, Sanjay Raut, Maharashtra politics
RERA Act : नवीन फ्लॅट घेताय? थांबा! आधी RERA मधील 'हे' नियम वाचा, नाहीतर होऊ शकते मोठी फसवणूक

गेल्या १२ वर्षांत पहिल्यांदाच मोदी सरकारला आपल्या एका मंत्र्याचा आणि तोही शिक्षणमंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला आहे. शिक्षण खातं हे देशाच्या तरुण पिढीला घडवणारे खाते आहे, पण दुर्दैवाने या खात्याला वाळवी लागली आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला. या खात्यासाठी दूरदृष्टी असलेला आणि उत्तम सुशिक्षित नेता हवा, असा विचार नरेंद्र मोदींच्या मनात आला असावा. सध्याच्या घडीला उच्चशिक्षित नेता म्हणून देवेंद्र फडणवीस दिसतात. म्हणूनच मोदींनी फडणवीसांना विचारणा करून केंद्रात बोलावले आहे. या देशाला एक उत्तम शिक्षणमंत्री मिळावा हीच आमची इच्छा आहे, आता फडणवीस काय निर्णय घेतात हा त्यांचा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com