पावसाळ्यात मिळणारी भुईकोहळा रानभाजी खाल्ली आहे का? घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

भुईकोहळा भाजी

भुईकोहळा ही पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे. शेताच्या कडेला आणि जंगलात ही भाजी उगवते.

Bhuikohala Bhaji Recipe

आरोग्यासाठी गुणकारी

भुई कोहळा भाजी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. भुई कोहळ्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन्स-सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

Bhuikohala Bhaji Recipe

साहित्य

भुईकोहळ्याची भाजी बनवण्यासाठी भुईकोहळ्याची भाजी बनवण्यासाठी भुईकोहळाची पाने, तूर किंवा मसूर डाळ, हिरवी मिरची पेस्ट, शेंगदाणा कूट, बेसन पीठ, मोहरी- हिंग, गूळ, मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा.

Bhuikohala Bhaji Recipe

भाजी स्वच्छ निवडून घ्या

सर्वातआधी भुईकोहळा भाजीची कोवळी पाने स्वच्छ निवडून दोन ते तीन वेळा पाण्यात धुवून घ्या. त्यानंतर भाजी बारीक चिरा.

भाजी शिजवून घ्या

त्यानंतर एका कुकरमध्ये भाजी आणि डाळ मऊ शिजवून घ्या

Bhuikohala Bhaji Recipe

भाजीला फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये हिरवी मिरची पेस्ट आणि ठेचलेला लसूण याची चांगली फोडणी द्या.

Fodni

भाजी मिक्स करा

नंतर या मिश्रणात उकडून घेतलेली भाजी मिक्स करा. भाजीत थोडेसे पाणी मिक्स करून चांगली शिजवून घ्या.

V

शेंगदाण्याचा कूट मिक्स करा

भाजी शिजली की त्यात शेंगदाण्याचा कूट मिक्स करा आणि भाजी चांगली परतून घ्या.

Bhuikohala Bhaji Recipe | yandex

भुईकोहळा भाजी तयार

अशाप्रकारे घरच्या घरी भुईकोहळा भाजी तयार होईल.

Bhuikohala Bhaji Recipe

NEXT: हेल्दी डाएटसाठी परफेक्ट! घरच्या घरी बनवा राजमा सूप

Rajma Soup Recipe
येथे क्लिक करा...