Manasvi Choudhary
राजमा सूप तुम्ही हेल्दी डाएटसाठी प्या. राजमामध्ये प्रथिने, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे सूप पचनासाठी हलके असते.
राजमा सूप तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. अत्यंत सोपी रेसिपी आहे.
सूप बनवण्यासाठी राजमा, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, जिरा पावडर, अमूल बटर, कोथिंबीर, मीठ पाणी हे साहित्य घ्या.
सूप बनवण्यासाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये पाण्यात राजमाचे दाणे भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये राजमा शिजवून घ्या. राजमाचे पाणी फेकून देऊ नका ते तुम्ही सूपसाठी वापरू शकता.
गॅसवर एका पॅनमध्ये बटर टाका नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण, आलं चांगले परतून घ्या. मिश्रणात कांदा चांगला गुलाबी होईपर्यत परतून घ्या.
कांदा परतल्यानंतर त्यात टोमॅटो घाला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. नंतर त्यात हळद, जिरे पावडर आणि काळी मिरी पावडर घाला.
मिश्रणात उकडलेला राजमा मिक्स करा. राजमा मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करा. Rajma Soup Recipe
मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करा. नंतर ही पेस्ट एका पातेल्यामध्ये ओता आणि त्यात पाणी मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला.
सूपला चांगली उकळी येऊ द्या. अशाप्रकारे घरच्या घरी राजमा सूप तयार होईल.
NEXT: पार्लरला जाण्याची गरज नाही! रोज 10 मिनिटे चेहरा आणि मानेला मसाज करा, त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो