Manasvi Choudhary
आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धूळ, प्रदूषण यामुळे चेहऱ्यावरची चमक कमी झाली आहे. यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करतात. मात्र आज आम्ही तुम्ही एक सोपी ट्रिक सांगणार आहोत ती तुम्ही घरीच करायची आहे.
रोज फक्त १० मिनिटे चेहरा आणि मानेवरचा मसाज केल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. त्वेचवर नैसर्गिकरित्या ग्लो येईल.
१) मसाज सुरू करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा मॉइश्चरायझर लावा.
२) मसाजची सुरूवात मानेपासून करा. बोटांच्या मदतीने मानेवर खालून वरच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मानेवरील काळेपणा आणि टाईटनिंग सुधारण्यास मदत होते.
३) दोन्ही हातांच्या बोटांनी व्ही-शेपने हनुवटीपासून कानापर्यंतच्या भागावर हलक्या हाताने वरच्या दिशेने मसाज करा. यामुळे डबल चीनची समस्या कमी होते.
४० गालावर वर्तुळाकार आकारात बोटं फिरवा. ओठांच्या बाजूने गालावर वरच्या दिशेने मसाज करा. यामुळे गालांना नॅचरल ब्लश आणि टॉनिक इफेक्ट मिळतो.
चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण वेगवान होते, ज्यामुळे त्वचेच्या पेशींना ऑक्सिजन मिळतो आणि चेहरा टवटवीत दिसतो.
नियमित मसाजमुळे चेहऱ्यावर आणि मानेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत.
फेस मसाजमुळे चेहऱ्यावरील साचलेले टॉक्सिन्स बाहेर पडतात ज्यामुळे पिंपल्स आणि डागांचा त्रास कमी होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.