yashasvi jaiswal saam tv news
Sports

Yashasvi Jaiswal Statement: जयस्वालचा 'यशस्वी' होण्याचा सक्सेस मंत्र काय? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा

Ind vs Afg 2nd T20I: या सामन्यात यशस्वी जयस्वालने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३४ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान त्याने या सामन्यानंतर मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal On Virat Kohli And Rohit Sharma:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना इंदुरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.

यासह टी-२० मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने मोलोची भूमिका बजावली आहे. त्याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३४ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान त्याने या सामन्यानंतर मोठा खुलासा केला आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी मैदानावर आली होती. रोहित स्वस्तात माघारी परतला. मात्र यशस्वी जयस्वालने एक बाजू धरुन ठेवली. त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची खेळी केली.

या खेळीनंतर बोलताना यशस्वी जयस्वाल म्हणाला की,' मला माझा नैसर्गिक खेळ कर असं सांगण्यात आलं होतं आणि मी तेच केलं. मला संधी मिळाली की मी शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होतो. मला संघाला चांगली सुरुवात करुन द्यायची होती. संघाला चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर माझा फोकस मोठी खेळी करण्यावर होता. मी चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करण्याच्या प्रयत्नात होतो.' (Latest sports updates)

तसेच विराट कोहलीसोबत खेळत असताना काय चर्चा झाली याबाबत बोलताना तो म्हणाला की,'जेव्हा जेव्हा मी विराट भैय्यासोबत फलंदाजी करतो तेव्हा ती माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असते. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. मी कुठल्या दिशेने शॉट खेळावे यावरुन आमची चर्चा झाली.'

तसेच रोहित शर्माबाबत बोलताना तो म्हणाला की,'ते नेहमी म्हणतात की तू जा आणि बिंधास्त खेळ. ने मला नेहमी हेच म्हणतात की, तू तुझा नैसर्गिक खेळ कर. असं म्हणणारा वरिष्ठ खेळाडू जेव्हा आपल्या संघात असतो तेव्हा खूप बरं वाटतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Western Railway Block : मुंबईकरांनो लक्ष असू द्या! पश्चिम रेल्वेवर रविवारी ५ तासांचा जम्बो ब्लॉक, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा |VIDEO

Maharashtra Live News Update: अजित पवार पुण्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार

Oppo Find X9: भारतात २०० एमपी कॅमेरासह 'हा' नवीन फोन होणार लाँच, कंपनीने दिली ९९ रुपयांची खास ऑफर

Samantha Ruth Prabhu: साऊथ अभिनेत्री समांथाने कथित बॉयफ्रेंडसोबतचा फोटो केला पोस्ट, फोटोंवर लाईक्सचा होतोय वर्षाव

४ नवीन वंदे भारत धावणार! PM नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील, वाचा थांबे अन् वेळापत्रक

SCROLL FOR NEXT