RUTURAJ GAIKWAD  TWITTER
क्रीडा

IND A vs AUS A: ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचा 'फुसका बार'; ऋतुराज 'गोल्डन डक', अख्खा संघ 107 धावांवर तंबूत

India A vs Australia: भारतीय अ संघ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ या दोन्ही संघांमध्ये पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे.

Ankush Dhavre

बॉर्डर- गावसकर ट्रॉफीला येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. भारताचा संपूर्ण डाव अवघ्या १०७ धावांवर आटोपला.

भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिमन्यू ईश्वरन आणि ऋतुराज गायकवाडची जोडी मैदानावर आली भारताला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. कर्णधार ऋतुराज गायकवाड शून्यावर माघारी परतला.

त्यानंतर अभिमन्यू ईश्वरनला अवघ्या अवघ्या ७ धावा करता आल्या. भारताकडून फलंदाजी करताना देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. तर साई सुदर्शन २१, बाबा इंद्रजित ९, इशान किशन, नितिश रेड्डी ०, मानव सुतार १, नवदीप सैनी २३ आणि प्रसिद्ध कृष्णा शून्यावर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना,ब्रेंडन डगेटे सर्वाधिक ६ गडी बाद केले.

या सामन्यासाठी भारतीय अ संघाची प्लेइंग ११:

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, इशान किशन (व.), नितीश रेड्डी, मानव सुथार, साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, बाबा इंद्रजीथ, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया 'अ' प्लेइंग ११:

नेथन मॅकस्विनी (कर्णधार), कॅमरॉन बॅंक्रॉफ्ट, टॉड मर्फी, फर्गस ओ'नेल, जोश फिलिपे, बीऊ वेबस्टर, जॉर्डन बकिंगहॅम, ब्रेंडन डॉगेट, कूपर कॉनोली, मार्कस हॅरिस, सॅम कॉन्स्टस.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatapavali Benefits: जेवणानंतर २ मिनिटं शतपावली करण्याचे फायदे!

Maharashtra Politics: कोणाला पडायचं, कुठे लढायचं, या दिवशी घेणार निर्णय; मनोज जरांगेंनी आपली रोखठोक भूमिका केली जाहीर; VIDEO

Pune Travel : बॅग भरो निकल पडो! दिवाळीच्या लाँग वीकेंडला करा पुण्याची सफर; 'या' ५ अफलातून ठिकाणांचे सौंदर्य पाहून हरखून जाल!

Nora Fatehi: नोरा फतेहीचा कातिल अंदाज; सौंदर्य पाहून घाम फुटेल

Satara Crime : धक्कादायक.. कर्ज देत नसल्याचा राग; बँकेत जात मॅनेजरवर कोयत्याने वार

SCROLL FOR NEXT