rohit-sharma saam tv news
क्रीडा

Rohit Sharma Statement: 'काय ते आताच सांगा..' टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील नेतृत्वाबाबत रोहित स्पष्टच बोलला

Rohit Sharma On T20 World Cup Captaincy: वर्ल्डकप स्पर्धा झाल्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती

Ankush Dhavre

Rohit Sharma To BCCI Officials:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाचं तिसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याची स्वप्न भंगलं. ही स्पर्धा झाल्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत भविष्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या वेळापत्रकावर देखील चर्चा करण्यात आली.

रोहित शर्मा- राहुल द्रविड होते उपस्थित..

वर्ल्डकपच्या आढावा बैठकीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा हे देखील उपस्थित होते. या बैठकीत रोहित शर्माने टी-२० क्रिकेट खेळण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, रोहित शर्माने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, जर तुम्ही माझी टी-२० वर्ल्डकपसाठी निवड करणार असाल तर त्यासंबंधी माहिती मला आत्ताच द्या.' या वृत्तात असा ही दावा करण्यात आला आहे की, बीसीसीआयचे अधिकारी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवडकर्ते यांनी मिळून रोहित शर्माकडे टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही काळ त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.' (Latest sports updates)

नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० मालिकांची मालिका पार पडली. या मालिकेतही विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १० डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. टी-२० मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दोन्ही मालिकेतून रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. तो थेट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत कमबॅक करताना दिसून येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT