Marriage Tips : जोडीदार वयाने मोठा असेल तर फरक पडतो? सायकियाट्रिस्टनं दिली महत्त्वाची टिप्स

Shreya Maskar

लग्न

लग्नाचे महत्त्व दोन व्यक्तींना सामाजिक, कायदेशीर आणि भावनिक बंधनात जोडून स्थिर, आनंदी आणि वैयक्तिक विकासासाठी आधार देणारे आहे. आजकाल लग्नासंबंधित प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना, मते आहेत, ज्यांचा आदर केला पाहिजे.

Marriage | pinterest

लग्नाचे वय

भारतात लग्नासाठी कायदेशीर वय मुलींसाठी १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे पूर्ण असे आहे. मात्र मानसिक प्रगल्भता आणि आर्थिक स्थैर्यासाठी अनेकदा २५ ते ३० वर्षे हे वय अधिक योग्य मानले जाते.

Marriage | yandex

मुला-मुलीच्या वयातील अंतर

लग्नासाठी मुला-मुलीच्या वयात साधारण ३ ते ५ वर्षांचे अंतर योग्य मानले जाते. या फरकामुळे परिपक्वता आणि सुसंवाद चांगला राहतो. तसेच वैवाहिक जीवन सुखकर राहते.

Marriage | pinterest

मोठा मुलगा

लग्नामध्ये मुलगा वयाने मोठा असावा, ही एक पारंपरिक समजूत आहे, जी प्रामुख्याने परिपक्वता, आर्थिक स्थिरता आणि शारीरिक/भावनिक सुरक्षेच्या कल्पनेवर आधारित आहे. मोठा मुलगा अधिक समजूतदारपणे संसार सांभाळू शकतो आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पेलू शकतो, असे बोले जाते. तसेच आजकाल मुलापेक्षा मुलगी वयाने मोठी असेल तरी हे सामान्य मानले जाते.

Marriage | pinterest

मानसोपचारतज्ज्ञ

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, नात्यामध्ये वयाच्या फरकापेक्षा मानसिक परिपक्वता, भावनिक समज आणि जीवनातील ध्येये अधिक महत्त्वाची असतात. आजकाल लग्नासाठी वय पाहणे तितके गरजेचे वाटत नाही.

Marriage | pinterest

वैज्ञानिक दृष्टिकोन

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, पती-पत्नीच्या वयातील फरक १० वर्षाहून अधिक असेल तर काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. उदा. जीवनशैली आणि भविष्यातील प्राधान्यक्रम

Marriage | yandex

यशस्वी नात्याचे सीक्रेट

तुम्हाला तुमचे नाते वयाच्या पलीकडे यशस्वी करायचे असेल, तर भावनिक परिपक्वता, परस्पर आदर, मोकळा संवाद, ध्येयांची जुळवणूक, वैयक्तिक जागेचा आदर, मैत्री, प्रेम या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

Marriage | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Marriage | pinterest

NEXT : कडक उन्हातही मिळेल आराम; डेलीवेअरसाठी नेसा 'या' सुंदर साड्या, डिझाइन्स आहेत खूपच खास

Saree For Summer | pinterest
येथे क्लिक करा...