ICC World Cup 2023 Points Table Team India shock after South Africa win against Australia Saam TV
Sports

World Cup 2023 Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर; टीम इंडियाला धक्का

ICC World Cup 2023 Points Table: आफ्रिकेने मोठ्या फरकाने सामना जिंकल्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला असून टीम इंडियासह तीन संघाचा धक्का बसला आहे.

Satish Daud

ICC World Cup 2023 Points Table

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील दहावा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात झाला. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. (Latest Marathi News)

या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ १७७ धावांवरच गारद झाला. त्यामुळे आफ्रिकेने हा सामना तब्बल १३४ धावांनी आपल्या खिशात घातला. दरम्यान, आफ्रिकेने इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकल्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला असून टीम इंडियासह तीन संघाचा धक्का बसला आहे.

आफ्रिकेने विश्वचषक गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे काल परवापर्यंत गुणतालिकेत टॉपला असलेल्या न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर टीम इंडियाची (Team India) तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. याशिवाय पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.

वर्ल्डकप 2023 पॉइंट टेबल

वर्ल्डकप स्पर्धेत २०२३ (World Cup 2023) आतापर्यंत सर्वच संघांनी प्रत्येकी २ सामने खेळले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, टीम इंडिया आणि पाकिस्तान संघाने दोनपैकी दोन्ही सामन्यात विजय मिळवले आहेत. याशिवाय इंग्लंडला आणि बांग्लादेशला १-१ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर श्रीलंका, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला अजून खातेही उघडता आले नाहीत.

या चारही संघांना पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ गुणतालिकेत टीम इंडियाच्या पुढे आहेत. नेट रनरेट कमी असल्याने भारत तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा फटका

सर्वात मोठा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. ऑस्ट्रेलियाची थेट घसरण नवव्या स्थानावर झाली आहे. वर्ल्डकपच्या तिसऱ्या टप्प्याचे सामने शुक्रवारपासून सुरु होणार आहेत. या टप्प्यातील जय पराजय बरंच चित्र पालटून टाकतील. भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात हार जीत गुणतालिकेत उलथापालथ करणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water : नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? 99% लोकांना माहीत नसेल

Restaurant style sambar masala: घरच्या घरी कसा बनवाल साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईल सांबार मसाला

Stampede Safety Tips : चेंगराचेंगरी झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी?

Tamanna Bhatia:'आज की रात' फेम तमन्ना भाटियाचा नवा लूक, फोटो तुफान व्हायरल

Shahapur : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; पाणी पुरवठा करणारे तीनही धरण ओव्हरफ्लो

SCROLL FOR NEXT