आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह भारताच्या विजयाचे हिरो ठरले. आता टीम इंडियाचा सामना शनिवारी पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र, या सामन्याआधीच भारताला गुड न्यूज मिळाली आहे. (Latest Marathi News)
भारत-अफगाणिस्तान (Team India) सामना सुरु असताना आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारी केएल राहुलने मोठी झेप घेतली आहे. याशिवाय विराट कोहलीला देखील जबरदस्त फायदा मिळाला आहे. राहुल आणि कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. या कामगिरीचे त्यांना अपेक्षित फळ मिळालंय.
आयसीसी क्रमवारी केएल राहुलने तब्बल १५ स्थानांची झेप घेतली असून तो फलंदाजांच्या यादीत १९ व्या क्रमांकावर आला आहे. तर विराट कोहलीला (Sport News) एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता सातव्या क्रमांकावर आलाय. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
रासी वॉन डेर डुसेन क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असून चौथ्या स्थानावर आयर्लंडचा हॅरी टेक्टर तर पाचव्यावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक हा वनडे क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
क्रमवारीत सर्वात मोठा फायदा इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलानला झालाय. त्याने बांगलादेशविरुद्ध १४० धावांची खेळी केली होती. क्रमवारीत तो सात स्थानांनी पुढे झाला आहे. मलान आता क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. विराट आणि त्याच्यात फक्त चार गुणांचा फरक आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.