ICC Women’s U19 T20 World Cup Final : आयसीसी महिला अंडर-१९ टी-२० विश्वचकाचा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला आठ विकेटने धूळ चारून भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता शफाली वर्माच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडिया अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे.
या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. सुपर सिक्स फेरीपासून टीम इंडियाला आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा भारतीय संघ हा विश्वचषक आपल्या नावावर करण्यसाठी सज्ज आहे.
१९ वर्षीय शफाली वर्माचं नाव देशासाठी नवं नाही. कारण १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचे कर्णधारपद भूषवण्यापूर्वी वरिष्ठ संघात तिने चमकदार कामगिरी केली आहे. शेफालीने वयाच्या १५ व्या वर्षी भारतात पदार्पण केले आहे. आता ती वरिष्ठ संघात एक विश्वासार्ह आणि स्फोटक सलामीवीर आहे. तिच्या नेतृत्वात देशाच्या विश्वचषक विजयाचा आशा अधिक उंचावल्या आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आयसीसी महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम, सेनवेस पार्क येथे होणार आहे. हा सामना रविवारी (२९जानेवारी) सायंकाळी ५.१५ वाजता खेळला जाणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आयसीसी महिला अंडर-१९ टी२० विश्वचषक 2023 मधील अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट-1 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट-1HD वर पाहू शखता. याशिवाय या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅपवरही उपलब्ध असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.