Ind Vs Eng U-19 T20 World Cup - आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी आणि संपुर्ण देशवासियांनी महत्वाचा दिवस आहे. कारण १९ वर्षाखाली महिला विश्वचषकाच्या फायनलचा थरार आज रंगणार आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघाची लढत इंग्लडविरुद्ध असणार आहे. कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लड संघाला धूळ चारण्यासाठी सज्ज झाली आहे. (U19 T20 World Cup)
19 वर्षीय शेफाली वर्मा क्रिडा जगतातील लोकप्रिय चेहरा बनली आहे. कारण तिने 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचे कर्णधारपद भूषवण्यापूर्वी वरिष्ठ संघात देखील चमकदार कामगिरी केली होती. शेफालीने वयाच्या 15 व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले, T20 विश्वचषकात तिने आपल्या खेळीची चुणूक दाखवली होती.
आता ती वरिष्ठ संघात एक विश्वासार्ह आणि धडाकेबाज सलामीवीर आहे. पण इथे जबाबदारी वेगळी आहे, कारण शेफाली (Shefali Varma) अंडर-19 संघाची कर्णधार आहे आणि संपूर्ण देशवासियांना तिच्याकडून विश्वचषक उंचावण्याच्या अपेक्षा आहेत.
टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास....
भारतीय महिला संघाच्या विश्वचषकातील प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी टीम इंडियाने एकूण 6 सामने खेळले आहेत. यापैकी ५ जिंकले आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया वगळता प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आहे, त्यामुळेच आता इंग्लंडला पराभूत करण्याची क्षमता आहे आणि वर्ल्डकपचे स्वप्नही पूर्ण होताना दिसत आहे.
19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडिया-
शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, ऋषिता बसू, पार्श्वी चोप्रा, अर्चना देवी, फलक नाज, हर्ले गाला, रिचा घोष, मन्नत कश्यप, सोनिया मेंढिया, तीतस साधू, शबनम, सौम्या तिवारी, गोंगडी त्रिशा, सोनम यादव
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.