team india twitter
Sports

IND vs NZ: मिशन T-20 WC साठी टीम इंडिया सज्ज! केव्हा, कुठे अन् कधी रंगणार सामने? इथे पाहा फुकटात

ICC Womens T20 World Cup 2024: आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दरम्यान भारतीय संघ आज आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Ankush Dhavre

India vs New zealand, Womens T20 World Cup 2024: महिलांच्या टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा श्रीगणेशा बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात झालेल्या सामन्याने झाला आहे. तर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ देखील ॲक्शनमध्ये असणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

यावर्षी भारतीय पुरुष संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. तर दुसरीकडे भारतीय महिला संघाला आजवर एकदाही टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय महिला संघ पूर्ण जोर लावताना दिसून येईल. दरम्यान जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्वकाही.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना केव्हा अन् किती वाजता सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना आज (४ ऑक्टोबर) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कुठे खेळला जाईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कुठे पाहू शकता लाईव्ह?

आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय महिला संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना सजीवन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT