NZ vs SL: केन विलियम्सन विराटवर पडला भारी! कसोटीतील मोठ्या रेकॉर्डमध्ये सोडलं मागे
kane williamson virat kohliyandex

NZ vs SL: केन विलियम्सन विराटवर पडला भारी! कसोटीतील मोठ्या रेकॉर्डमध्ये सोडलं मागे

Kane Williamson Breaks Virat Kohli Record: न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सनने विराटला मोठ्या रेकॉर्डमध्ये मागे सोडलं आहे.
Published on

न्यूझीलंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यात अनुभवी फलंदाज केन विलियम्सनला मोठी खेळी करता आलेली नाही. मात्र लवकर बाद होऊनही त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीला मागे सोडलं आहे.

केन विलियम्सन हा न्यूझीलंड संघातील अनुभवी फलंदाज आहे. मात्र त्याला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मोठी खेळी करता आलेली नाही. या सामन्यात त्याला ४६ धावा करता आल्या आहेत. त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १०२ सामन्यांमध्ये ५४.४८ च्या सरासरीने ८८८१ धावा केल्या आहेत.

तर विराट कोहलीच्या नावे ८८७१ धावा करण्याची नोंद आहे. विराट सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत २० व्या स्थानी आहे. तर केन विलियम्सनने त्याला आता मागे सोडलंय. विलियम्सन आता १९ व्या स्थानी पोहोचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आहेत. त्यामुळे विराट कोहली लवकरच केन विलियम्सनला पुन्हा एकदा मागे सोडू शकतो.

NZ vs SL: केन विलियम्सन विराटवर पडला भारी! कसोटीतील मोठ्या रेकॉर्डमध्ये सोडलं मागे
IND vs BAN: 3 वर्ष संघाबाहेर असलेल्या गोलंदाजाला टीम इंडियात संधी! गंभीर सोबत आहे खास कनेक्शन

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात अवघ्या काही धावा करताच तो पुन्हा एकदा केन विलियम्सनला मागे सोडू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत १५९२१ धावा केल्या. सचिनला वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला १४ धावांचा पल्ला देखील गाठता आलेला नाही.

NZ vs SL: केन विलियम्सन विराटवर पडला भारी! कसोटीतील मोठ्या रेकॉर्डमध्ये सोडलं मागे
IND vs BAN 2nd Test: पावसाचा खेळ चाले... एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा समारोप, चाहत्यांच्या आशेवर पाणी!

फॅब ४ मध्ये टॉपला कोण?

फॅब ४ मध्ये विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रुट आणि केन विलियम्सन यांचा समावेश आहे. हे चौघेही मॉडर्न डे क्रिकेटमधील टॉपचे फलंदाज आहेत. या चारही फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट अव्वल स्थानी आहे. रुटने १२४०२ धावा केल्या आहेत. तर स्टीव्ह स्मिथच्या नावे ९६८५ धावा करण्याची नोंद आहे. या यादीत विराट कोहली सर्वात मागे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com