Team USA Vs Team India VS Team Pakistan in T20 World Cup 2024 Google
Sports

T20 World Cup 2024 Super 8: टीम इंडियाचा सुपर ८ मध्ये प्रवेश! पाकिस्तान की अमेरिका; कोणाला मिळणार तिकीट?

T20 World Cup 2024 Super 8 Scenario: भारतीय संघाने अ गटातून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने अमेरिकेला नमवत टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. या विजयासह पाकिस्तानच्या सुपर ८ मध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र सुपर ८ मध्ये जाण्याचा मार्ग हा मुळीच सोपा नसणार आहे. इथून पुढे पाकिस्तानसाठी कसं असेल समीकरण? समजून घ्या.

भारतीय संघाने या स्पर्धेतील ३ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर अमेरिकेने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट सुपर ८ मध्ये जाण्याची संधी होती. भारतीय संघाने या संधीचा फायदा घेतला आणि सुपर ८ चं तिकीट मिळवलं. अमेरिकेचा शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

पाकिस्तानला जर सुपर ८ मध्ये जायचं असेल, तर प्रार्थना करावी लागेल की, अमेरिकेचा या सामन्यातही पराभव झाला पाहिजे. त्यानंतर पाकिस्तानचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानला मोठा विजय मिळवावा लागणार आहे. असं झाल्यास पाकिस्तानचे सुपर ८ मध्ये जाण्याचे दार उघडतील.

अमेरिकेला सुपर ८ मध्ये जाण्याची संधी?

अमेरिकेचा संघ देखील सुपर ८ मध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय. अमेरिकेने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे आयर्लंडने २ सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे अमेरिका आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये सामना झाल्यास अमेरिकेचं पारडं जड असणार आहे. हा सामना जिंकून अमेरिकेचा संघ सुपर ८ मध्ये दणक्यात प्रवेश करेल. तर पाकिस्तानचा संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडेल.

भारतीय संघाचा शानदार विजय

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील २५ वा सामना भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना ११० धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १११ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी मिळून भारतीय संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

SCROLL FOR NEXT