england and pakistan cricket team google
Sports

T-20 World Cup 2024: हे ३ बलाढ्य संघ सुपर ८ मधून होऊ शकतात बाहेर! AFG अन् USA ला संधी

T20 WC 2024, Super 8 Scenario: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळणारे संघ सुपर ८ मध्ये जाण्याच्या वाटेवर आहेत. तर वर्ल्ड क्रिकेटमधील बलाढ्य संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. ज्यात गतविजेता इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या संघांचा समावेश आहे. दरम्यान जाणून घ्या ३ असे संघ जे सुपर८ च्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात.

इंग्लंड

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत इंग्लंडचा संघ ब गटात आहे. इंग्लंडचा पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध होणार होता. हा सामना पावसामुळे रद्द केला गेला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला गेला. त्यानंतर पुढील सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडला जर सुपर ८ च्या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर नामिबिया आणि ओमानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.

न्यूझीलंड

न्यूझीलंडचा क गटात समावेश करण्यात आला आहे. या संघाला पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र या संघाचे अजूनही ३ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या संघाला अजूनही सुपर ८ मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे. मात्र केवळ सामने जिंकून चालणार नाही, तर त्यांना प्रार्थनाही करावी लागेल की, वेस्टइंडिजने आपले उर्वरीत सामने गमावले पाहिजे.

पाकिस्तान

पाकिस्तानला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्याच सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली. २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला एकही गुणाची कमाई करता आलेली नाही. पाकिस्तानला जर सुपर ८ मध्ये जायचं असेल तर पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. यासह त्यांना प्रार्थनाही करावी लागणार आहे की, अमेरिका आणि कॅनडाने आपले उर्वरित सर्व सामने गमवावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

SCROLL FOR NEXT